कर्मचाऱ्यांअभावी जरंडी कोविड केंद्राला कुलूप
By | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:28+5:302020-12-02T04:10:28+5:30
सोयगाव तालुक्यातील कोरोना संसर्गाची मदार जरंडी कोविड केंद्रावर आहे. असे असताना पदवीधर मतदार निवडणुकांच्या कामात गुंतलेल्या प्रशासनाला जरंडी कोविड ...
सोयगाव तालुक्यातील कोरोना संसर्गाची मदार जरंडी कोविड केंद्रावर आहे. असे असताना पदवीधर मतदार निवडणुकांच्या कामात गुंतलेल्या प्रशासनाला जरंडी कोविड केंद्राचा विसर पडला. रुग्णसंख्या कमी झाल्याच्या कारणावरून शनिवारी थेट सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यावर कर्मचाऱ्याविना झालेल्या कोविड केंद्राला रविवारी थेट कुलूप लागले होते. सध्या सोयगाव तालुक्यात कोरोना चाचण्या बंद झाल्या आहेत. मात्र, कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेबाबत नागरिकांत अद्यापही धास्ती आहे.
छायाचित्र ओळ- सोयगाव येथील कुलूपबंद अवस्थेत असलेले कोविड केंद्र.