जशोदाबेन नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरात; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अन् भद्रा मारूतीचे घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:16 IST2025-02-07T17:15:50+5:302025-02-07T17:16:11+5:30
घृष्णेश्वर मंदीराच्या व्हिजिट बुकमध्ये, 'बहुत अच्छा लगा' असा अभिप्राय जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी नोंदविला.

जशोदाबेन नरेंद्र मोदी छत्रपती संभाजीनगरात; घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अन् भद्रा मारूतीचे घेतले दर्शन
खुलताबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीर व खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरास भेट देवून मनोभावे दर्शन घेतले.
वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदीरास जशोदाबेन नरेंद्र मोदी या भेट देणार असल्याने ८ ते १० पोलीस कर्मचा-यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व श्री घृष्णेश्वर मंदीरा समोरील चौकातही वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी कार्यरत होते. दुपारी १२:३० वाजता जशोदाबेन मोदी यांनी श्री घृष्णेश्वर मंदीरात प्रवेश केला. घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेक व महापुजा केली.
दरम्यान, मंदीर देवस्थानच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी व्हिजिट बुकमध्ये, 'बहुत अच्छा लगा' असा अभिप्राय नोंदविला. त्यानंतर खुलताबाद येथील भद्रा मारूती मंदीरास भेट देवून दर्शन घेतले. येथे भद्रा मारूती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ यांनी त्याचे स्वागत केले.