जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 07:38 PM2021-09-15T19:38:43+5:302021-09-15T19:42:48+5:30

पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले.

Jayakwadi Dam @ 66.54%; 57,000 cusecs from Nashik, Nagar district | जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

जायकवाडी धरण @ ६६.५४%; नाशिक, नगर जिल्ह्यातून ५७ हजार क्युसेसने आवक

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ तासात धरणाच्या जलसाठ्यात पाच टक्के अशी भरघोस वाढ

पैठण ( औरंगाबाद ) :  नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमुहातून मंगळवारी मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने बुधवारी सकाळपासून जायकवाडी धरणात ५७४५७ क्युसेस अशी मोठ्या क्षमतेने आवक सुरू आहे. १२ तासात धरणाच्या जलसाठ्यात पाच टक्के अशी भरघोस वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने तेथील धरणसमुहातून होणारे विसर्ग बुधवारी सायंकाळी ६ वाजता घटविण्यात आले आहेत अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून देण्यात आली. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या विसर्गामुळे गोदावरी ४० हजार.क्युसेस क्षमतेने वहात असून अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून झालेल्या विसर्गामुळे प्रवरा नदीही २७ हजार क्युसेस अशी प्रवाही झाली आहे. अहमदनगरचे पाणी आज सकाळी ९ वाजता जायकवाडी धरणात येऊन धडकले. यामुळे दोन्ही नद्यांचे मिळून जायकवाडी धरणात ५७४५७ अशी मोठ्या क्षमतेने आवक झाली. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारे विसर्ग  घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले.  बुधवारी सायंकाळी अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा १४२५ क्युसेस, निळवंडे ६८५ क्युसेस व ओझर वेअर मधून १०९३ क्युसेस असा नाममात्र विसर्ग प्रवरेत करण्यात येत आहे. 

हेही वाचा - मराठवाड्यात ४२ ठिकाणी ढगफुटी; २० लाख ३९ हजार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

यामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत घट होत आहे. नाशिक जिल्ह्यातील विसर्ग बुधवारी घटविण्यात आले असून दारणा २६७२क्युसेस, कडवा १२७२ क्युसेक्स, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर ५५३ क्युसेस व नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून ८०४० क्युसेस असे विसर्ग सुरू आहेत. विसर्ग घटविण्यात आल्याने गोदावरीची पाणी पातळी काही प्रमाणात कमी होणार आहे. बुधवारी सायंकाळी ६ वा धरणाचा जलसाठा ६६.५४% एवढा झाला होता. दरम्यान गुरुवारी सकाळपर्यंत ७०% पेक्षा जास्त जलसाठा होईल अशी अपेक्षा धरण अभियंता विजय काकडे यांनी व्यक्त केली आहे. १५२२ जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी १५१५.३४ फूट झाली असून धरणात एकूण जलसाठा २१८२.४४ दलघमी ( ७७.०६ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १४४४.४४४ दलघमी ( ५१ टिएमसी ) एवढा झाला आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! औषधींसाठी रात्री मोजा २० हजार; दिवसा फक्त ४०० रुपये

Web Title: Jayakwadi Dam @ 66.54%; 57,000 cusecs from Nashik, Nagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.