जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 06:54 PM2022-07-18T18:54:58+5:302022-07-18T18:55:33+5:30

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो.

Jayakwadi Dam @75 %; possibility of dissolution if Rain, inflow increases, villager warned to be alert near Gowavari Besin | जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद) : धरणात जुलै महिण्यातच ७५% जलसाठा झाला असून पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला पाऊस व येणारी आवक लक्षात घेता जायकवाडी धरणातून केव्हाही विसर्ग केला जाऊ शकतो. यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा सोमवारी सायंकाळी ४ वाजता. जायकवाडी प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाचा इशारा धडकताच गोदाकाठच्या गावात खळबळ उडाली आहे. 

सोमवारी दुपारी २ वा जायकवाडी धरणाचा जलसाठा ७४% झाला होता. शिवाय धरणात ३६२०६ क्युसेक्स अशी आवक सुरू होती. सोमवारी पाणलोटक्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात येणारी आवक वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत धरणातून विसर्ग करावा लागू शकतो अशी शक्यता जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी वर्तवली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

जलसाठा ७९% पार गेल्यास होणार विसर्ग.....
जायकवाडी धरणात १५ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान कोणत्या तारखेला किती जलसाठा ठेवावा याचा परिचलन आराखडा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. दरम्यान या प्रचलन आराखड्या नुसार १५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान ७९.११ % पेक्षा जास्त जलसाठा धरणात ठेवता येत नाही. धरणात येणारी आवक लक्षात घेता मंगळवारी धरणाचा जलसाठा ७९% पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. यानंतर धरणात जीतकी आवक होईल तीतकाच विसर्ग करण्यात येईल अशी शक्यता धरणाचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातील दारणा ४०३४, कडवा ६४७, वालदेवी २४१, गंगापूर १३७७, आळंदी ४४७, भोजपूर ५४० व नांदूरमधमेश्वर वेअर मधून २८१७० क्युसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू होता. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा ८३५, नीळवंडे ८०० व ओझरवेअर बंधाऱ्यातून २१२२ क्युसेक्स क्षमतेने प्रवरा नदीत विसर्ग करण्यात येत होता. सोमवारी जायकवाडी धरणात ३६२०६ क्युसेक्स आवक सुरू होती यात वाढ होणार असल्याने धरणातून विसर्ग करावा लागू शकतो असे अशोक चव्हाण व विजय काकडे यांनी सांगितले. 

गोदाकाठच्या गावात धावपळ..
सोमवारी सायंकाळी धरणाचा जलसाठा  ७५% पेक्षा पुढे सरकला होता. पाणी पातळी १५१७ फूट ईतकी झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी  आता फक्त पाच फूट पाण्याची आवक होणे गरजेचे आहे. धरणात उपयुक्त जलसाठा १६०५.७८५ दलघमी एवढा झाला आहे. जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या १४ गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिल्यानंतर या गावात मोठी धावपळ सुरू झाल्याचे दिसून आले. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकरी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलविण्यात गावकरी व्यस्त होते.

Web Title: Jayakwadi Dam @75 %; possibility of dissolution if Rain, inflow increases, villager warned to be alert near Gowavari Besin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.