जायकवाडी धरण ९० टक्के पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 02:04 PM2019-08-13T14:04:46+5:302019-08-13T14:17:06+5:30

आवक घटली; विसर्ग घटविला

Jayakwadi dam crosses 90% water level mark | जायकवाडी धरण ९० टक्के पार

जायकवाडी धरण ९० टक्के पार

googlenewsNext
ठळक मुद्दे९४ टीएमसी जलसाठाबंधाऱ्यांसाठी सोडण्यात आले पाणी

पैठण (जि. औरंगाबाद): नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून जायकवाडी धरणासाठी होणारा विसर्ग सोमवारी मोठ्या प्रमाणावर घटविण्यात आला. सोमवारी दुपारनंतर धरणात येणारी आवक सातत्याने घटत होती. मंगळवारी धरणात येणारी आवक अत्यंत कमी होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. यामुळे तूर्त जायकवाडी धरणातूनपाणी सोडण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. मंगळवारी सकाळी  ७ वाजता धरणाचा जलसाठा ९०.२३ टक्के झाला होता. 

अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीसाठी होणारा विसर्ग सोमवारी दुपारनंतर नगण्य करण्यात आला. मुळा धरणातून २००० क्युसेक, भंडारदरा १००० क्युसेक, निळवंडे ७०० क्युसेक असा मिळून ओझर वेअरमधून ४००० क्युसेकचा विसर्ग प्रवरेच्या पात्रात सुरू होता, होणारा विसर्ग लक्षात घेता प्रवरेतून मंगळवारी जायकवाडी धरणात येणारी आवक नगण्य होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून होणारा विसर्गसुद्धा आज कमी करण्यात आला. 

( 'जायकवाडी'तून माजलगाव धरणात पाणी सोडले; बीड,माजलगावसाठी दिलासा) 

दारणा धरणातून २५३८ क्युसेक, गंगापूर ७५८  क्युसेक व पालखेडमधून ३८०५ क्युसेक असा मिळून नांदूर-मधमेश्वर वेअरमधून १२८०६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू होता. या धरणातील विसर्ग तेथे पाऊस नसल्याने अत्यंत कमी करण्यात येणार असल्याने मंगळवारी गोदापात्रातून जायकवाडीसाठी येणारे पाणी कमी होणार आहे.

नाशिक, नगर जिल्ह्यात पाऊस उघडल्याने तेथील धरणांतून विसर्ग अत्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे धरणात येणारी आवक नगण्य राहणार असून, जायकवाडी धरण आणखी १२ टक्के भरणे बाकी असल्याने तूर्त धरणातून विसर्ग करण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे जायकवाडीचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

९४ टीएमसी जलसाठा
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी सोमवारी १५१९.८७ फूट झाली होती. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी २.१९ फूट बाकी आहे. जायकवाडी धरणात सोमवारी सायंकाळी ३३९२६ क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. धरणाचा एकूण जलसाठा २६६०.२४६ (९३.९३ टीएमसी) इतका झाला असून, यापैकी १९२२.१४० (६७.८७ टीएमसी) जिवंत जलसाठा आहे.

( परळी औष्णिक केंद्रासाठी जायकवाडीचे पाणी सोडले )

बंधाऱ्यांसाठी सोडण्यात आले पाणी
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक क्षमतेने परळी औष्णिक कें द्रासाठी पाणी सोडले. उजव्या कालव्याद्वारे ९०० क्युसेक क्षमतेने माजलगाव धरणासाठी पाणी पाणी सोडले. सोमवारी  जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्पातून पैठणमधील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी १५९० क्युसेक क्षमतेने पाणी सोडले.

Web Title: Jayakwadi dam crosses 90% water level mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.