जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:43 PM2022-07-25T19:43:59+5:302022-07-25T19:47:16+5:30

जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे.

Jayakwadi Dam opens its doors for the fourth year in a row; Dissolution takes place through 18 doors | जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

जायकवाडी धरणाचे सलग चौथ्या वर्षी दरवाजे उघडले; १८ दरवाज्यातून होतोय विसर्ग

googlenewsNext

औरंगाबाद: मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे सलग चौथ्यावर्षी दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज सायंकाळी सात वाजून २० मिनिटांना सुरुवातीला दोन दरवाजे उघडून गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. टप्याटप्प्याने एकूण १८ दरवाने अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या सुरुतीपासूनच जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरु आहे. सध्या ३६ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरु आहे. तसेच आणखी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवक वाढत जाणारी आहे. दरम्यान, धरणाची पाणीपातळी आज दुपारी ९० टक्के झाली. तसेच पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. यामुळे आज सायंकाळी धरणातून विसर्ग करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आज सायं ७:१५ वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. सुरुवातील दोन आणि टप्प्याटप्प्याने तब्बल १८ दरवाजे अर्धा फुटाने उघडून तब्बल ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. जुलै महिन्यात दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आल्याची मागील १५ वर्षातील ही दुसरी वेळ आहे. गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्क राहणेबाबत प्रशासनाने सूचना दिल्या आहेत. तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याचे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सलग चौथ्यावर्षी करण्यात आला विसर्ग
मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७६ साली जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाले. साधारणत: १०५ टीएमसी पाणी साठविण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाला ४६ वर्षे झाल्यामुळे अनेक दुरुस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. ४६ वर्षांत सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग मागील तीन वर्षांत करण्यात आला. धरणावरील वीजनिर्मितीचे सर्व रेकॉर्ड २०१९-२०२० या काळात मोडले. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. सध्या जायकवाडी धरणातून जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेक, उजवा कालव्यातून ५०० क्युसेक आणि १८ मुख्य दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

Web Title: Jayakwadi Dam opens its doors for the fourth year in a row; Dissolution takes place through 18 doors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.