जायकवाडी प्रकल्पाचे 'नाथसागर' नामांतर होणार;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 07:31 PM2021-09-27T19:31:23+5:302021-09-27T19:34:28+5:30

Jayakwadi Dam : जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची आहे.  

Jayakwadi project will be renamed as 'Nathsagar'; Assurance of Water Resources Minister Jayant Patil | जायकवाडी प्रकल्पाचे 'नाथसागर' नामांतर होणार;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

जायकवाडी प्रकल्पाचे 'नाथसागर' नामांतर होणार;जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

googlenewsNext

पैठण ( औरंगाबाद ) : पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचे ( Jayakwadi Dam ) नाव नाथसागर करण्यात येईल असे आश्वासन आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पैठणकरांना दिले. राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीसाठी आज जयंत पाटील ( Jayant Patil ) पैठण येथे आले होते.  (Jayakwadi project will be renamed as 'Nathsagar) 

जायकवाडी प्रकल्पाच्या जलसाठ्यास नाथसागर हे नाव दिलेले असून प्रकल्पासही नाथसागर हेच नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी पैठणकरांची आहे.  पैठण येथील माहेश्वरी भक्त निवासात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी परिवार परिसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संत एकनाथांच्या जन्म व कर्मभूमित असलेल्या जायकवाडी प्रकल्पाचे नाव नाथसागर करावे अशी पैठणकरांची मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कानावर घातली. तातडीने मागणी मान्य करत पाटील यांनी या बाबत आश्वासन दिले. दरम्यान, जायकवाडी प्रकल्प माजलगाव तालुक्यातील जायकोवाडी येथे मंजूर करण्यात आला होता. परंतु पैठणचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टीने हा प्रकल्प पैठण येथे उभारण्याचा निर्णय घेऊन पैठण परिसरात जायकवाडी वसाहत उभी करून हा प्रकल्प उभा केला असे जुन्या पिढीतील दिनेश पारिख यांनी सांगितले. नाथसागर नाव देण्याचे आश्वासनावर पारीख आनंद व्यक्त केला. 

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

परिवार संवाद झालाच नाही.....
परिसंवादासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली. यामुळे मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, महेबूब शेख आदी पदाधिकारी विवंचनेत पडले. एवढ्या मोठ्या परिवाराचा संवाद कसा घ्यावा हा तर मेळावा झाला, लवकरच आपण मेळावा घेऊ असे जयंत पाटील यांनी दत्ता गोर्डे व तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांना सांगितले. केवळ दहा मिनीटे मार्गदर्शन करून पैठण येथून जयंत पाटील व त्यांचा ताफा घनसावंगीकडे रवाना झाला. यामुळे परिवार परिसंवाद झालाच नाही. दरम्यान यावेळी पत्रकारांना कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आला.

निजामाच्या विचारांचे लोक निवडून येतात हे मराठवाड्याचे दुर्दैव

Web Title: Jayakwadi project will be renamed as 'Nathsagar'; Assurance of Water Resources Minister Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.