जायकवाडीचे पाणी कालव्याद्वारे इंद्रायणी नदीत झाले दाखल
By Admin | Published: March 13, 2016 02:44 PM2016-03-13T14:44:58+5:302016-03-13T14:48:23+5:30
दैठणा : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता इंद्रायणी नदीत दाखल झाले़ या पाण्यामुळे दैठण्यासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न काही दिवसांपुरता मार्गी लागला आहे़
दैठणा : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी १२ मार्च रोजी दुपारी १ वाजता इंद्रायणी नदीत दाखल झाले़ या पाण्यामुळे दैठण्यासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न काही दिवसांपुरता मार्गी लागला आहे़
गंगाखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडले आहे़ हे पाणी इंद्रायणी नदीमार्गे मुळीच्या बंधाऱ्यात सोडले जाणार आहे़ दरम्यान शनिवारी वाकडी येथील डाव्या कालव्यातून हे पाणी इंद्रायणी नदीपात्रात सोडण्यात आले़
यावेळी सरपंच नीता कच्छवे, उपसरपंच किशनराव कच्छवे, डॉ़ संदीप कच्छवे यांच्यासह कालवा निरीक्षक वसंत लोणारकर, मदन मोरे, माजी कालवा निरीक्षक माणिकराव कच्छवे आदी उपस्थित होते़ सरपंच निता कच्छवे यांच्या हस्ते जलपूजा करण्यात आली़ या पाण्यामुळे दैठणासह अन्य गावांचा पाणीप्रश्न काही दिवसांपुरता मिटला आहे़