१५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:54 PM2017-10-29T23:54:16+5:302017-10-29T23:54:23+5:30

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़

'Jayakwadi' water will be available from November 15 | १५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

१५ नोव्हेंबरपासून मिळणार ‘जायकवाडी’चे पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़
जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक २२२ पासून सुरू होतो़ मुख्य डाव्या कालव्यावर पाथरी आणि मानवत तालुक्याचा अर्धा भाग येतो़
पाथरी उपविभागात बोरगाव, पाथरी, गुंज, बाभळगाव-४, बाभळगाव-५, हादगाव, केकरजवळा या सात शाखा आहेत़ जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून २०१० साली पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर पूर्ण क्षमतेने जायकवाडी धरण न भरल्यामुळे या भागातील सिंचनही खंडीत झाले होते़ सात वर्षानंतर जायकवाडी धरण पहिल्यांदाच १०० टक्के भरले आहे़ यामुळे या भागातील शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ जायकवाडी धरण पाण्याच्या आवर्तनासंदर्भात औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात २६ आॅक्टोबर रोजी परभणी, जालना आणि औरंगाबाद विभागातील अधिकाºयांची बैठक झाली़ यामध्ये जिल्ह्यात लागणाºया पाण्याचा आढावा घेण्यात आला़ कालवा समितीच्या निर्णयानंतर पाणी सोडण्यासाठीचे जाहीर प्रगटन काढले जाणार आहे़
यावर्षी गोदावरी नदीपात्रातील पाथरी तालुक्यातील दोन्ही बंधारे तुडूंब भरले आहेत़ त्याचबरोबर जायकवाडीचे पाणी मिळणार असल्याने शेतकºयांनी पिकांचे नियोजन सुरू केले आहे़
रबी हंगामातील गहू, ज्वारी आणि खरीप हंगामातील कापूस, तूर याबरोबरच उसासाठीही नियोजन सुरू आहे़ पाथरी उपविभागात १० हजार हेक्टर क्षेत्र पाणी पाळी सिंचनाखाली येणार असल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

Web Title: 'Jayakwadi' water will be available from November 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.