विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 05:10 PM2024-06-26T17:10:52+5:302024-06-26T17:13:18+5:30

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

Jayant Patil reacted on whether MLAs from Ajit Pawar's group will be included in Sharad Pawar's group | विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले तर महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाच जागेवर विजय झाला. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आता विधासभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

जयंत पाटील म्हणाले, जुन्या नेत्यांना परत घेणे आता ही आमची प्रायोरिटी नाही. पण, जे कार्यकर्ते परत येऊ इच्छितात. जे सत्तेत गेलेले नाहीत किंवा ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे. असे काही घटक आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. आमच्याकडे नवीन चेहरेही यायला लागले आहेत. तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते पुढं यायला लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करुन योग्य तो विचार करु, असंही जयंत पाटील म्हणाले. 

"आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. फक्त संपर्क करणे, यावर बोलणे योग्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी यावर बोलेन, असंही पाटील म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे

यावेळी बोलताना जयंत पाटील यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जयंत पाटील किंवा अ , ब, क मुख्यमंत्री याच्यात कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलो पाहिजे हे स्वारस्य पहिले पाहिजे. आज कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

Web Title: Jayant Patil reacted on whether MLAs from Ajit Pawar's group will be included in Sharad Pawar's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.