जेसीबी, मिक्सरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:36 AM2017-08-29T00:36:31+5:302017-08-29T00:36:31+5:30
रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना कंत्राटदाराने अनधिकृतरीत्या मिक्सरच्या सहाय्याने काँक्रीट तयार केल्याच्या कारणावरुन २७ आॅगस्ट रोजी जेसीबी मशीन आणि काँक्रिट मिक्सरवर कारवाई करत ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यामुळे पूल उभारणीचे काम बंद पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : रेल्वे उड्डाणपुलाचे काम करताना कंत्राटदाराने अनधिकृतरीत्या मिक्सरच्या सहाय्याने काँक्रीट तयार केल्याच्या कारणावरुन २७ आॅगस्ट रोजी जेसीबी मशीन आणि काँक्रिट मिक्सरवर कारवाई करत ही दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. त्यामुळे पूल उभारणीचे काम बंद पडले आहे.
येथील पालम नाका भागात रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम सुरु व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वीच कामाला प्रारंभ झाला होता. उड्डाणपुलाला जोडणारे खांब उभारण्यासाठी ४० ते ५० फुटापर्यंत खोल खड्डे तयार करुन त्यात सिमेंट काँक्रीट भरले जात आहे. २७ आॅगस्ट रोजी हे काम सुरु असताना उपविभागीय अधिकारी अमोलसिंह भोसले यांनी इसाद रोडवर कामाच्या साईटला भेट दिली. तेव्हा सिमेंट काँक्रिट मिक्सर (एम.एच.२१ एक्स ३२६५) मध्ये वाळू आणि खडी मिक्स केली जात होती. या सहाय्याने काँक्रिट तयार केले जात होते. तर जेसीबी मशीन (क्र.एचएआर थ्रीडीक्स ५५ टी-०१८६०६९७) वाळू काँक्रिट मिक्सरमध्ये टाकली जात होते. तयार केलेले काँक्रिट ६ एमक्यू हे नाशवंत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे उपविभागीय अधिकाºयांनी रिकामे काँक्रिट मिक्सर व जेसीबी मशीन पोलीस ठाण्यात आणून लावली. उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशावरुन पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यातून सोडली नसल्याने उड्डाणपुलाचे काम ठप्प पडले होते.