नागझरी नदीतून वाळू उत्खनन करताना जेसीबी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 09:25 PM2019-05-06T21:25:20+5:302019-05-06T21:25:33+5:30
महसूल विभागाच्या पथकाने तुर्काबाद परिसरातील नागझरी नदीपात्रात सोमवारी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारा जेसीबी पकडला.
वाळूज महानगर : महसूल विभागाच्या पथकाने तुर्काबाद परिसरातील नागझरी नदीपात्रात सोमवारी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करणारा जेसीबी पकडला. पथक आल्याची चाहुल लागताच वाळू भरणारा चालक हायवासह फरार झाला आहे.
गंगापूर तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल विभागाचे नायब तहसीलदार अभय बेलसरे, वाळूजचे तलाठी अशोक कळसकर, तलाठी जितेंद्र कळसकर, तलाठी सुनिल वाघमारे यांच्या पथकाला नागझरी नदीपात्रात जेसीबीने वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने नागझरी नदी परिसरात छापा मारला. तेथून जेसीबी (एम.एच.२०, ई.वाय.५५२४) जप्त केला. मात्र, हायवा चालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
पथकाने जेसीबी चालक इंदरचंद देवरे याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या रॉयल्टी नसल्याचे दिसून आले. यावेळी चालक देवरे याने या जेसीबीचा मालक अरुण बाळु जाधव (रा.तुर्काबाद ता.गंगापूर) असल्याचे नायब तहसीलदार बेलसरे यांना सांगितले.
यावेळी महसुल विभागाने घटनास्थळी पंचनामा करुन पकडलेला जेसीबी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केला असून फरार हायवाचा शोध सुरु आहे. संबधित जेसीबी चालकावर ंदंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांनी सांगितले.