जेईई अॅडव्हान्स परीक्षा सुरळीत
By Admin | Published: May 23, 2016 01:18 AM2016-05-23T01:18:19+5:302016-05-23T01:23:22+5:30
औरंगाबाद : आयआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी रविवारी जेईई अॅडव्हान्स परीक्षा झाली. औरंगाबादेत पहिल्यांदाच या परीक्षेचे केंद्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
औरंगाबाद : आयआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी रविवारी जेईई अॅडव्हान्स परीक्षा झाली. औरंगाबादेत पहिल्यांदाच या परीक्षेचे केंद्र मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. शहरात विविध तीन केंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी जवळपास १२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत भौतिकशास्त्र (फिजिक्स) या विषयाचे प्रश्न थोडेसे कठीण असल्याची बाब काही परीक्षार्र्थींनी बोलून दाखविली.
औरंगाबादेत सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय आणि जेएनईसी या तीन ठिकाणी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा घेण्यात आली. या तिन्ही परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी ४०० असे एकूण १२०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी स. भु. विज्ञान महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर सकाळी पहिल्या पेपरला २१ विद्यार्थी आणि दुपारी दुसऱ्या पेपरसाठी २७ विद्यार्थी अनुपस्थित होते. सकाळी ९ ते १२ वाजेदरम्यान पहिला पेपर होता. तथापि, ओळखपरेडसाठी विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजता परीक्षा केंद्रांवर बोलावण्यात आले होते.