जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा

By विजय सरवदे | Published: April 29, 2023 02:48 PM2023-04-29T14:48:10+5:302023-04-29T14:48:38+5:30

जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी उद्यापासून ३० एप्रिल ते ७ मेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालेल.

JEE Main Session-II Result Declared; Students start preparing for the advance exam | जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा

जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांनो ॲडवान्स परीक्षेच्या तयारीला लागा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जेईई मुख्य सत्र-२ चा निकाल जाहीर झाला आहे. जेईई  परीक्षेच्या आधारे आयआयटी व यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी दोन सत्रांमध्ये जेईई मेन्स परीक्षा घेण्यात आली. जानेवारीमध्ये पहिल्या सत्रातील परीक्षा झाल्यानंतर नुकतीच एप्रिलमध्ये दुसऱ्या सत्राची जेईई मेन्स परीक्षा झाली. 

जेईई ॲडवान्स परीक्षेसाठी उद्यापासून ३० एप्रिल ते ७ मेपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालेल. त्यानंतर ८ मेपर्यंत शुल्क भरण्याचा  कालावधी आहे. प्रवेशपत्र २९ मे ते ४ जून यादरम्यान उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ४ जूनला सकाळी नऊपासून पेपर क्रमांक १, तर दुपारी अडीचपासून पेपर क्रमांक २ पार पडणार आहे. जूनच्या अंतिम आठवड्यात या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. आता जेईई ॲडवान्सड परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), गुवाहाटी यांच्यातर्फे केले जाते आहे.
 

Web Title: JEE Main Session-II Result Declared; Students start preparing for the advance exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.