जीप-दुचाकीची धडक, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:39 AM2017-11-04T01:39:29+5:302017-11-04T01:39:49+5:30
जीप आणि तळणीहून वाघाळ्याकडे जाणा-या दुचाकीची टक्कर होऊन दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : कोकरसा येथून सावरगावकडे जाणारी क्रूझर जीप आणि तळणीहून वाघाळ्याकडे जाणा-या दुचाकीची टक्कर होऊन दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. तर क्रूझरमधील सात ते आठ जण गंभीर जखमी झाले. तळणी ते मंठा रोडवरील नेमीनाथ महाराज मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.
कोकरसा येथून विदर्भातील सावरगावकडे भरधाव जाणा-या जीपने (क्र. एमएच २२ यू. १६०१) तळणीवरून वाघाळ्याकडे जात असलेल्या दुचाकीला (क्र.एमएच. २० ए.ओ ६२९२ ) मंठा रोडवरील नेमीनाथ मंदिराजवळ जोरदार धडक झाली. हा अपघात दुचाकीवरील राजाराम शेषराव जटाळे (२५) व यशवंता शेषराव बोंडे (३० रा. दोघे वाघाळा ता. मंठा ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जीपमधील अनिता अंबादास चव्हाण (१७ रा. जांभरूण), वंश अंकुश राठोड (३), लिंबाजी भिमला चव्हाण, पूजा संतोष राठोड, संतोष हरिभाऊ चव्हाण ( ३ ), अंकुश मोहन राठोड (३० सर्व रा. कोकरसा ता. मंठा) हे जखमी झाले. जखमींमध्ये अन्य दोघांचा समावेश असून, त्यांची नावे कळू शकली नाहीत. अपघात झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना खाजगी दवाखान्यात दाखल केले.
या प्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.