जीपचालकास पोलिसांची अमानूष मारहाण
By Admin | Published: May 21, 2016 11:35 PM2016-05-21T23:35:30+5:302016-05-22T00:06:24+5:30
बीड : बसस्थानकात जीपसह आलेल्या खासगी मेकॅनिकला पोलिसांनी गुरुवारी रात्री अमानूष मारहाण केली. याप्रकरणी मेकॅनिकवरच गुन्हा नोंदविण्यात आला.
बीड : बसस्थानकात जीपसह आलेल्या खासगी मेकॅनिकला पोलिसांनी गुरुवारी रात्री अमानूष मारहाण केली. याप्रकरणी मेकॅनिकवरच गुन्हा नोंदविण्यात आला.
सय्यद जकियोद्दीन अमिरोद्दीन (रा. शहेंशाहनगर, बीड) असे मारहाण झालेल्या मेकॅनिकचे नाव आहे. ते गुरुवारी रात्री दहा वाजता बसस्थानकात स्वत:ची जीप घेऊन आले होते. यावेळी त्यांना चौकी पोलिसांनी हटकले. त्यानंतर पोलीस कर्मचारी व सय्यद जकियोद्दीन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला जीपमधून खाली खेचत चौकीत नेले. तेथे त्याला बेल्ट व काठीने मारहाण केली. पोकॉ संघर्ष गोरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सय्यद जकियोद्दीन यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान रायुकॉचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक व माजी उपनगराध्यक्ष फारुक पटेल यांनी अधीक्षक अनिल पारसकर यांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
याबाबत शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे म्हणाले, त्याने पोलिसांशी अरेरावी केली होती. पहिल्या दिवशी नोटीस देऊन त्याला सोडले होते. २४ तास उलटल्यानंतर तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्यामुळे त्याने बनाव केल्याचा संशय आहे. (प्रतिनिधी)