जेट एअरवेजच्या विमानाला पक्ष्याची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:30 PM2018-10-03T22:30:55+5:302018-10-03T22:31:45+5:30

मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना (बर्ड हिट) बुधवारी सकाळी घडली. विमानाच्या डाव्या पंख्याला पक्षी धडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान सुखरूप धावपट्टीवर उतरविले. सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नसल्यामुळे विमानातील ९० प्रवासी बालंबाल बचावले. या घटनेनंतर औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले.

 Jet Airways flight bird hit | जेट एअरवेजच्या विमानाला पक्ष्याची धडक

जेट एअरवेजच्या विमानाला पक्ष्याची धडक

googlenewsNext
ठळक मुद्देवैमानिकाचे प्रसंगावधान : ९० प्रवासी बालंबाल बचावले, औरंगाबाद-मुंबई विमान रद्द

औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना (बर्ड हिट) बुधवारी सकाळी घडली. विमानाच्या डाव्या पंख्याला पक्षी धडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून वैमानिकाने विमान सुखरूप धावपट्टीवर उतरविले. सुदैवाने कोणतीही विपरीत घटना घडली नसल्यामुळे विमानातील ९० प्रवासी बालंबाल बचावले. या घटनेनंतर औरंगाबाद-मुंबई विमान रद्द करण्यात आले.
जेट एअरवेजचे विमान मुंबईहून बुधवारी पहाटे ५.१२ वाजता औरंगाबादकडे झेपावले. सकाळी ६.२० वाजेच्या सुमारास चिकलठाणा विमानतळावर उतरण्यासाठी विमान सज्ज झाले. विमानाला अचानक पक्ष्याची धडक बसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. वैमानिकाने खबरदारी घेऊन विमान सुरक्षित धावपट्टीवर उतरविले. पुढील प्रवासाआधी विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. तेव्हा विमानाच्या डाव्या पंख्याला पक्ष्याची धडक बसल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान तात्काळ उड्डाण करण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे औरंगाबाद-मुंबई विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले.
वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांच्यासह राजकीय व्यक्ती, उद्योजक असे १३० प्रवासी मुंबईला जाण्यासाठी सकाळी ६ वाजता विमानतळावर आले होते. अपघातामुळे सर्वांनी सहकार्याची भूमिका दाखविली. प्रारंभी सुरक्षेच्या दृष्टीने पडताळणी आणि आवश्यक त्या दुरुस्तीनंतर हे विमान ८.३० आणि नंतर १२ वाजता उड्डाण करील, असे सांगण्यात आले. परंतु अखेरीस उड्डाण रद्द झाल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
किमान हजार फूट उंच
पक्षी साधारपणे पाचशे ते एक हजार फुटांपर्यंत उडतात. त्यामुळे इतक्या उंचीवर विमानाला पक्ष्याची धडक बसण्याची शक्यता विमानतळावरील अधिकाºयांनी वर्तविली. पक्षी धडकण्याच्या घटनेनंतर विमानतळावर जेट एअरवेजच्या अधिकारी-कर्मचाºयांची एकच पळापळ सुरू होती. विमानाची दुरुस्ती करण्यासाठी तांत्रिक पथकाची मदत घेण्यात आली. ज्याठिकाणी पक्ष्याची धडक बसली, त्याची छायाचित्रे पाठवून तांत्रिक माहिती घेण्यात आली.
सर्वसामान्य घटना
विमानाच्या पंख्याला पक्षी धडकल्याचे विमान उतरल्यानंतर लक्षात आले. पक्षी धडकणे ही सर्वसामान्य घटना आहे. त्यात कोणताही धोका नाही. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात आली. खबरदारी म्हणून विमानाची दुरुस्ती करण्यात आली, अशी माहिती जेट एअरवेजच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली.
---------------

Web Title:  Jet Airways flight bird hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.