रांजणगावात बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:41 PM2018-11-18T20:41:44+5:302018-11-18T20:41:54+5:30
वाळूज महानगर : संविधान व लोकशाही वाचवा अभियानांतर्गत बहुजन समाज विरोधी सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच गुजरात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करुन खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने रांजणगाव येथे रविवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वाळूज महानगर : संविधान व लोकशाही वाचवा अभियानांतर्गत बहुजन समाज विरोधी सरकारच्या धोरणाविरुद्ध तसेच गुजरात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करुन खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने रांजणगाव येथे रविवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले.
बहुजन क्रांती मोर्चातर्फे संविधान व लोकशाही बचाव अभियानांतर्गत सरकारच्या बहुजन समाज विरोधी धोरणाविरुद्ध तसेच विविध मागण्यांसाठी देशभर जेलभरो आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रांजणाव येथे रविवारी दुपारी ४ वाजता बहुजन क्रांती मोर्चातर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले. सुरुवातीला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन पायी रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकार संविधानाच्या कलम १९ चा दुरुपयोग करत असून, कोरेगावभिमा प्रकरणातील मुख्य आरोपीला पाठिशी घालत असल्याचा आरोप करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणून काही वेळानंतर सोडून दिले. या आंदोलनास भारत मुक्ती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, आदिवासी छात्र संघटना, राष्ट्रीय मुलनिवासी संघ, सत्यशोधक वारकरी संघ आदी संघटनांनी पाठिंबा दिला.
आंदोलनात राहुल सोनवणे, एस.डी. जगताप, विष्णू येडे, स्वप्निल शेजवळ, संतोष साळवे, राहुल सोनुले, सुरेश वाघमारे, भारत पाईकराव, राहुल रणवीर, आम्रपाली वाघमारे, सीता जगताप, छाया पाईकराव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आहेत मागण्या ..
१. सरकारने संविधानाच्या कलम १९ चे पालन करावे. २. मतदानासाठी ईव्हीएम मशिनचा वापर बंद करुन बॅलेट पेपरचा वापर करावा. ३. भिमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपीला सरकारने तात्काळ अटक करावी. ४. भिमा कोरेगाव प्रकरणात आंदोलन कर्त्यांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. ५. एससी, एसटी वर होणारे अत्याचार थांबवावेत.