औरंगाबादेत भव्य वाहन रॅली काढून जिजाऊंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:13 AM2018-01-13T01:13:57+5:302018-01-13T01:14:04+5:30

राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी क्रांतीचौकातून दुचाकी, चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती. यामध्ये शेकडो दुचाकी, चारचाकीधारकांनी सहभाग नोंदविला. भगवे झेंडे, पोवाडे आणि आकर्षक पेहरावांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Jijau greeted by a massive vehicle rally in Aurangabad | औरंगाबादेत भव्य वाहन रॅली काढून जिजाऊंना अभिवादन

औरंगाबादेत भव्य वाहन रॅली काढून जिजाऊंना अभिवादन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी क्रांतीचौकातून दुचाकी, चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली होती. यामध्ये शेकडो दुचाकी, चारचाकीधारकांनी सहभाग नोंदविला. भगवे झेंडे, पोवाडे आणि आकर्षक पेहरावांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
बुलंद छावा संघटनेतर्फे क्रांतीचौकातून चारचाकी वाहन रॅलीचे आयोजन केले होते. राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती अध्यक्ष वंदना बनकर, कार्याध्यक्ष सीमा बोरसे, स्वागताध्यक्ष सुनीता काळे, सरचिटणीस रेणुका जाधव यांनी क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यानंतर वाहन रॅलीला डॉ. दत्ता कदम यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अभिजित देशमुख, प्रभाकर मते, अरुण शेरे, किशोर शितोळे, सुरेश वाकडे पाटील, साहेबराव मुळे, ज्ञानेश्वर जाधव, मनोज गायके, योगेश देशमुख, प्रदीप हारदे, रतन काळे यांच्यासह शेकडो जिजाऊप्रेमी उपस्थित होते. या वाहन रॅलीमध्ये ज्योतीराम पाटील युवा मंचतर्फे आयोजित दुचाकी रॅलीतील जिजाऊप्रेमींनी सहभाग घेतला. क्रांतीचौकातून दुचाकी आणि चारचाकी रॅली पैठण गेट, सिटी चौक, संस्थान गणपती, गांधी पुतळा, मोंढा नाका, सेव्हन हिल, आविष्कार चौकमार्गे टी.व्ही. सेंटर येथे पोहोचली. तेथे जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी जगन्नाथ काळे यांनी मार्गदर्शन केले. नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी समारोप केला.
छत्रपती महाविद्यालयापासून निघाली दुचाकी रॅली
ज्योतीराम पाटील युवा मंचतर्फे राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी छत्रपती महाविद्यालय येथून दुचाकी रॅली काढण्यात आली होती. कामगार चौक, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिलमार्गे ही रॅली क्रांतीचौक येथे पोहोचली. तेथून बुलंद छावातर्फे आयोजित चारचाकी रॅलीमध्ये ही दुचाकी रॅली सहभागी झाली. या रॅलीचे नेतृत्व मनपाचे माजी सभागृह नेते नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांनी केले. या रॅलीच्या उद्घाटनवेळी नगरसेवक आत्माराम पवार, राजाराम मोरे, रामदास गायके आदी उपस्थित होते. या दुचाकी रॅलीमध्ये ५०० पेक्षा अधिक दुचाकीस्वारांनी सहभाग घेतल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Jijau greeted by a massive vehicle rally in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.