भाजप सरकारमुळेच नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:22 AM2017-09-28T00:22:17+5:302017-09-28T00:22:17+5:30
खोटी आश्वासने देवून साडे तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद पाडली आहेत़ या योजनेअंतर्गत आलेला तब्बल ३०० कोटींचा निधी त्यामुळे परत गेला़ स्मार्ट सिटी योजनेतूनही नांदेडला डावलण्यात आले़ त्यामुळे अशा जुमलेबाज सरकारच्या थापावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : खोटी आश्वासने देवून साडे तीन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नांदेडातील जेएनएनयुआरएमची कामे बंद पाडली आहेत़ या योजनेअंतर्गत आलेला तब्बल ३०० कोटींचा निधी त्यामुळे परत गेला़ स्मार्ट सिटी योजनेतूनही नांदेडला डावलण्यात आले़ त्यामुळे अशा जुमलेबाज सरकारच्या थापावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले़
अतिथी हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत अतुल लोंढे म्हणाले, देशात गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजप सरकारने खोटी आश्वासने देवून सत्ता मिळविली़ सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता असे समीकरणच झाले आहे़ लाखो कोटींच्या घोषणा करायच्या अन् प्रत्यक्षात एक रुपयाही द्यायचा नाही़ अशी जुमलेबाजी सातत्याने सुरु आहे़ ‘मेक इन इंडिया’ यासारख्या योजना फुसका बार निघाल्या आहेत़ त्यामुळे आता अर्थव्यवस्था भीषण संकटात सापडली आहे़ जीडीपी सातत्याने घसरत चालला आहे़ परंतु मोदी सरकारमधील कुणीही अर्थव्यवस्था, जीडीपी या विषयावर बोलण्यास तयार नाही़ उलट सरकारच्या निर्णयावर सोशल माध्यमातून टीका करणाºयांवर मात्र थेट पोलीस कारवाई करण्याचा सपाटाच सुरु केला आहे़ या कारवाईचा काँग्रेस निषेधच करते़
ज्या-ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता आहे़ त्या-त्या ठिकाणच्या नागरिकांची आता भाजपाकडून फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे़ जकात, एलबीटी बंद केल्यानंतर महापालिकांना १४ टक्के नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ प्रत्यक्षात ते ८ टक्के देण्यात आले़ त्यामुळे महापालिकेकडे कर्मचाºयांचे वेतन करण्याएवढेही पैसे नाहीत़
नांदेडचा चेहरामोहरा बदलणाºया जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेची नांदेडातील कामे या सरकारने बंद पाडली़ स्मार्ट सिटीमधूनही नांदेडचे नाव वगळण्यात आले़ परंतु स्मार्ट सिटी ही सुद्धा अशीच फसवी घोषणा असून या योजनेत समाविष्ट देशभरातील शहरांसाठी केवळ सात हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे़
नांदेडकरांना माजी गृहमंत्री दिवंगत शंकरराव आणि आता माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले आहे़ नांदेडकरांची आसक्ती आणि प्रतिभावान नेतृत्वामुळे नांदेडचा आजपर्यंत विकास झाला आहे़ लवकरच राज्यात सत्तांतर होणार असून पुन्हा राज्याचे नेतृत्व नांदेडकडेच येणार असल्याचेही लोंढे म्हणाले़
भाजपाच्या प्रभारींचे त्यांच्या नेत्यांकडे किती वजन आहे? ते फार छोटे नेते आहेत़ त्यांना त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते किती वेळ देतात हाही संशोधनाचा विषय आहे़ संभाजी पाटील निलंगेकरांवर असा टोलाही लोंढे यांनी लगावला़ यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संतोष पांडागळे, मुन्तजीब यांची उपस्थिती होती़