सरकारी यंत्रणेतील नोकरी बेतत आहे जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:05 AM2021-01-22T04:05:22+5:302021-01-22T04:05:22+5:30

औरंगाबाद : भाजी खावी बटाट्याची आणि चाकरी करावी सरकारची, ही म्हण अडीच दशकांपूर्वी तंतोंतत खरी मानली जायची, परंतु ...

Jobs in the government system are on the line | सरकारी यंत्रणेतील नोकरी बेतत आहे जीवावर

सरकारी यंत्रणेतील नोकरी बेतत आहे जीवावर

googlenewsNext

औरंगाबाद : भाजी खावी बटाट्याची आणि चाकरी करावी सरकारची, ही म्हण अडीच दशकांपूर्वी तंतोंतत खरी मानली जायची, परंतु अलीकडच्या काळात सरकारी यंत्रणेतील नोकरी कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच यंत्रणेतील प्रमुख, राजकीय नेत्यांकडून आर्थिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी देखील अधून-मधून समोर येतच आहेत.

मागील काही वर्षांचा आढावा घेतला तर महसूल कर्मचाऱ्यांनी यंत्रणेतील प्रमुखांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसते. ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणेत वरिष्ठांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिंदे यांचा गटविकास अधिकाऱ्यांनी मानसिक छळ केल्याने त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अलीकडच्या काळातील काही घटना

२०१५ साली शिवसेनेनेचे तत्कालीन खासदार आणि तहसिलदारामध्ये शिवीगाळ झाली होती.

खुलताबादमध्ये दोन वर्षांपूर्वी नायब तहसिलदाराला मारहाणीची घटना घडली होती. सिल्लोडमध्ये गेल्यावर्षी एका तलाठ्याने आत्महत्या केली. फेब्रुवारी २०२० मध्ये एका नायब तहसिलदाराला शेतकऱ्यांकडून मारहाण करण्यात आली होती. खुलताबादमधील एका अव्वल कारकुनाला वरिष्ठांना वाळू ठेक्या प्रकरणात मानसिक त्रास दिल्याने त्यांना हार्टअटॅक आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

संघटना कर्मचाऱ्यांसोबत राहणार

कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. महसूल कर्मचारी संघटना अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. यंत्रणेतील वरिष्ठांकडून जर कुणाला काही त्रास होत असेल तर कर्मचाऱ्यांनी संघटनेनेकडे दाद मागावी. आजवर जेव्हा-जेव्हा कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो, आणि त्यांच्या जीवावर बेतण्याचा प्रसंग आला आहे. संघटना न्याय मिळेपर्यंत लढा देत राहिली आहे. यापुढे देखील देईल. असे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरविंद धोंगडे यांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या छळाचे प्रमाण वाढतेय

सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना अनेक तणावात काम करावे लागते. संघटना म्हणून प्रत्येकाला मदत करण्याची आमची नेहमीच भावना राहिलेली आहे. महसूल किंवा इतर विभागातील यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक छळाचे प्रमाण वाढतच चालले आहे. मागील वर्षांतील घटना पाहिल्या तर वस्तुस्थिती समोर येते. काही दडपण असल्यास कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस महेंद्र गिरगे यांनी केले.

Web Title: Jobs in the government system are on the line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.