जोगेश्वरी ग्रा.पं. कार्यालयात महामानवाच्या पुतळ्यासाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:06 AM2021-06-09T04:06:21+5:302021-06-09T04:06:21+5:30
:नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी : नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी वाळूज महानगर : जोगेश्वरीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुना ...
:नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी
: नाहरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी
वाळूज महानगर : जोगेश्वरीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जुना पुतळा बदलून नवा पुतळा उभारावा यासाठी नागरिकांच्या वतीने मंगळवारी (दि. ८) ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जोगेश्वरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात उभारण्यात आलेला पुतळा जीर्ण झाला असून, या ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात यावा, यासाठी समाज बांधवाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, पुतळा उभारण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने समाज बांधवांनी लोकवर्गणीतून नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पुतळा उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी नागरिकांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी सरपंच गजाजन बोंबले, अमोल लोहकरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ग्रामपंचायतीमार्फत सुशोभीकरण, प्रवेशद्वार, पेव्हर ब्लॉक, संरक्षक, आदी कामे करण्यात आली आहेत. नवीन पुतळा उभारण्यासाठी पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत नाहरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नसल्याचे सांगितले. या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सरपंच व पदाधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी रवी दुगिंग, जाधव, विशाल सुरडकर, मनोज साळवे, अनिल मैंद, सुवर्णा पंडित, माया तांगडे, सुनंदा मगरे, आदींची उपस्थिती होती.
फोटो ओळ- जोगेश्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करताना समाजबांधव.
फोटो क्रमांक- जोगेश्वरी १/२/३
---------------------