जोगेश्वरी ग्रा.पं.ला ठोकले टाळे
By Admin | Published: August 24, 2014 01:19 AM2014-08-24T01:19:11+5:302014-08-24T01:49:52+5:30
वाळूज महानगर : गावातील विकासकामे करताना सरपंच व ग्रामविकास अधिकारी विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत आज एका सदस्याने जोगेश्वरी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.
वाळूज महानगर : गावातील विकासकामे करताना सरपंच व ग्रामविकास अधिकारी विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत आज एका सदस्याने जोगेश्वरी ग्रामपंचायतीला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला.
विविध विकासकामे सुरू असून, ग्रामपंचायत सदस्यांना डावलून कामे केली जात असल्याचा आरोप सदस्य दत्तू काजळे यांनी करून आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. अनेक सुविधांचा अभाव असून, समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करीत असल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप आहे. कारखान्यांकडून मोठ्या प्रमाणात कर मिळत असूनही प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. सरपंच योगेश दळवी यांनी काजळे यांची भेट घेऊन त्यांची समजूत घालून टाळे उघडले. कुलूप असल्यामुळे प्रमाणपत्रांसाठी व कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.