जोगेश्वरीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:02 AM2021-06-01T04:02:16+5:302021-06-01T04:02:16+5:30

फोटो ओळ- जोगेश्वरी ग्रामपंचायतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ----------------------------------- प्रेस मशीनमध्ये हात अडकून ...

Jogeshwari Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti | जोगेश्वरीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती

जोगेश्वरीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती

googlenewsNext

फोटो ओळ- जोगेश्वरी ग्रामपंचायतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

-----------------------------------

प्रेस मशीनमध्ये हात अडकून महिला कामगाराची दोन बोटे तुटली

:कंपनी मालक व सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज महानगर : अकुशल महिला कामगारास प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडून अपघातात तिची दोन बोटे तुटण्यास कारणीभूत ठरलेल्या कंपनी मालक व सुपरवायझरविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुवर्णा तुकाराम साळुंके (२५ रा.सावतानगर, रांजणगाव) या वाळूज एमआयडीसीतील रेणुका प्रेस कंपनीत काम करतात. १० एप्रिल रोजी सकाळी कंपनीत कामावर गेल्यावर सुवर्णा साळुंके यांना कंपनीतील सुपरवायझर बाबासाहेब बर्वे यांनी प्रेस मशीनवर काम करण्यास सांगितले. साळुंके यांनी मला मशीनवर काम करण्याचा अनुभव नाही तसेच आपण तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे सांगितले. मात्र बर्वे यांनी त्यांना बळजबरीने प्रेस मशीनवर काम करण्यास भाग पाडले. मशीनवर काम करीत असतांना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास सुवर्णा साळुंके यांचा डावा हात मशीनमध्ये अडकून दोन बोटे निकामी झाली. साळुंके यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केल्यानंतर कंपनीतील इतर कामगार व सुपरवायझर बर्वे यांनी मशीन बंद करुन जखमी अवस्थेत त्यांना पंढरपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सुवर्णा साळुंके यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर कंपनी मालक पंकज शेवाळकर व सुपरवायझर बाबासाहेब बर्वे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------ --------------

Web Title: Jogeshwari Rajmata Ahilya Devi Holkar Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.