असा आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अनुराधा पाटील यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 02:09 PM2019-12-19T14:09:42+5:302019-12-19T14:11:22+5:30

सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले.

This is the journey of Anuradha Patil, who has announced the Sahitya Akademi Award for 2019 | असा आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अनुराधा पाटील यांचा प्रवास

असा आहे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या अनुराधा पाटील यांचा प्रवास

googlenewsNext

‘कदाचित अजूनही’ हा अनुराधा पाटील यांचा पाचवा कविता संग्रह असून, तो २०१७ साली प्रकाशित झाला. यामध्ये विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकूण ५० कविता आहेत. याव्यतिरिक्त त्यांची दिगंत (कविता संग्रह), २. तरीही (कविता संग्रह), दिवसेंदिवस (कविता संग्रह), वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ (कविता संग्रह), नवसाला पावली डॉक्टरीण  (प्रौढ साक्षरांसाठी दीर्घकथा), दरअसल (कविता संग्रह, हिंदी अनुवाद) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ‘अनुराधा पाटील री टाळवीं मराठी कवितावां’ हा त्यांच्या कवितांचा राजस्थानी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. 

अनुराधा पाटील यांचा जन्म पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव) या गावी ५ एप्रिल १९५३ साली झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले. कविता लिहिणे, वक्तृत्व या गोष्टी शालेय जीवनापासूनच बहरत होत्या. मराठीचे प्राध्यापक असलेले कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर कविता लिखाणाला आणखीनच प्रोत्साहन मिळत गेले आणि एक प्रगल्भ कवयित्री म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. मागील ४५ वर्षांपासून अनुराधातार्इंचे लिखाण अविरतपणे सुरू आहे.

निवडक पुरस्कार
1981 ‘दिगंत’ कविता संग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे सर्वोत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार.
1986  ‘तरीही’ साठी मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थेचा पहिला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार.
1986 ‘तरीही’साठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे या संस्थेचा पहिला कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार.
1993  ‘तरीही’ ला महाराष्ट्र राज्य सरकारचा १९८६- ८७ या वर्षाचा उत्कृष्ट काव्यलेखनाचा केशवसुत काव्य पुरस्कार.
1993 ‘दिवसेंदिवस’ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना. धों. महानोर काव्य पुरस्कार.
1994 ‘दिवसेंदिवस’ला महाराष्ट्र फाऊंडेशन, न्यूयॉर्क, अमेरिका या संस्थेचा पहिला ललित वाङ्मय लेखनाचा पुरस्कार.
2011  मराठवाडा साहित्य परिषदेचा कविवर्य कुसुमाग्रज वाङ्मय पुरस्कार.
2011 कवी हरिश्चंद्र राय साहनी- दु:खी काव्य पुरस्कार, जालना.
2011 बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्ट आणि जैन फाऊंडेशन, जळगाव या संस्थेचा ‘बहिणाबाई सर्वोत्कृष्ट लेखिका जीवनगौरव वाङ्मय पुरस्कार’.
2013 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कविवर्य भा. रा. तांबे पुरस्कार.
2014 साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट, मुंबई या संस्थेचा ‘दरअसल’ या अनुवादाला विंदा करंदीकर राष्ट्रीय पुरस्कार.
2018 पळसखेडे येथून दिला जाणारा पहिला ‘रानगंध’ पुरस्कार. 


सन्मान : 
साहित्य अकादमी पुरस्कार निवडीसाठी तज्ज्ञ परीक्षक.
2006 साली ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या नावाने डॉ. दादा गोरे यांनी संपादित केलेला २७२ पानांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यात अनेक मान्यवरांचे लेख आहेत.
2019 साहित्य अकादमीच्या पूर्वोत्तरी आणि पश्चिमी भारतीय भाषा लेखिका संमेलनाच्या उद्घाटक 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग
२००६  व २००८ मध्ये जागतिक लेखक संमेलनात मान्यवर मराठी कवी म्हणून पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांतील निरनिराळ्या भाषांतील कवींसोबत मराठीचे प्रतिनिधित्व.
२०१३ साली मराठवाडा साहित्य परिषदेचे ‘अनुराधा पाटील यांची कविता’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र झाले होते. त्यात एकूण १४ अभ्यासकांनी त्यांच्या कवितेच्या सामर्थ्याचा, वेगळेपणा आणि मर्यादांचा निरनिराळ्या अंगांनी विचार केला. तसेच विविध शहरांमध्ये आणि साहित्य परिषदांमध्ये त्यांच्या कवितांवर चर्चासत्रे आयोजित केलेली आहेत. 

साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात संस्थात्मक कार्य
1977-80 मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य
2000-04 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य
2003-07 कोलकाता येथील भारतीय भाषा परिषद या संस्थेवर मानद सल्लागार सदस्य

Web Title: This is the journey of Anuradha Patil, who has announced the Sahitya Akademi Award for 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.