सखी संगे लुटा सहलीचा आनंद
By Admin | Published: June 7, 2016 11:45 PM2016-06-07T23:45:01+5:302016-06-07T23:50:08+5:30
औरंगाबाद : कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून एक दिवस आपल्या लाडक्या सखींसोबत जर केशरबागेत मनसोक्त बागडायला मिळाले
औरंगाबाद : कुटुंबाची चिंता बाजूला ठेवून एक दिवस आपल्या लाडक्या सखींसोबत जर केशरबागेत मनसोक्त बागडायला मिळाले तर काय बहार येईल ना? चला तर मग; लवकर अधिक विचार करण्यात वेळ न दवडता चटकन या सहलीच्या तयारीला लागा. लोकमत सखी मंचच्या वतीने खास तुमच्यासाठी या धमाल एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले
आहे.
केवळ आंब्याच्या बागेत मनसोक्त फिरणे, एवढ्यावरच ही सहल थांबत नाही. रेन डान्स, मिनी ट्रेनचा प्रवास, झाडांच्या सावलीत बसून सखींसोबत केलेले वनभोजन आणि खूप काही आव्हानात्मक खेळ या सगळ्या गमतीदार गोष्टींचा अनुभव या सहलीतून तुम्हाला मिळणार आहे. शिवाय मनसोक्त बागडून दमल्यावर आमरस आणि पुरणपोळीवर यथेच्छ ताव मारण्याचा आनंद काही वेगळाच. चला तर मग, वाट कशाची बघताय? लवकरात लवकर तुमच्या सखींना फोन करा आणि सर्व जणी मिळून या सदाबहार सहलीचा आनंद लुटा. सखी मंच सदस्यांव्यतिरिक्त इतर मैत्रिणीही या धमाल सहलीचा आनंद लुटू शकतात. मर्यादित जागा असल्यामुळे लवकर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दि. ११ जून, शनिवार रोजी केशरबाग, सावता माळीनगर, सिन्नर, घोटी रोड येथे ही सहल नेण्यात येणार आहे. सखी मंच सदस्यांसाठी सहल शुल्क रु. १५०० तर इतर महिलांसाठी रु. १८०० असेल. या सहल शुल्कात चहा, नाश्ता, जेवण या सर्व बाबींचा समावेश असेल. लहान मुलांना प्रवेश नाही. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद या ठिकाणी संपर्क साधावा किंवा ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क करावा. ०२४०- २४८५३०१-०४ या क्रमांकावरही तुम्ही संपर्क करू शकता.