वर्षभरात साडेतीन हजार ग्राहकांना न्याय
By Admin | Published: March 15, 2016 12:16 AM2016-03-15T00:16:23+5:302016-03-15T01:06:52+5:30
गजेंद्र देशमुख , जालना ग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन
गजेंद्र देशमुख , जालना
ग्राहकांची फसवूणक होऊ नये, झाल्यास त्यांना न्याय मिळावा म्हणून ग्राहक मंच आहे. या ग्राहक मंचात स्थानिक सोबतच आॅनलाईन खरेदी दरम्यान झालेल्या फसवुणकीबाबतही न्याय मिळतो. मंगळवारी होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहकमंचच्या अध्यक्षा अॅड. नीलिमा संत यांनी विविध मुद्यांवर ग्राहक हितांची जाणीव करून दिली.
दरवर्षी १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. व्यावसायिक व ग्राहक यांचे नाते खरेदीपुरतेच असल्याने सौहार्दपूर्ण असते. मात्र, उत्पादनात अथवा एखाद्या वस्तूत बिघाड आल्यास ग्राहक व व्यासायिकांत तणावपूर्ण संबंध बनतात. यातूनच कोर्ट कचेऱ्या होतात. काही ग्राहक ग्राहकमंचचा पर्याय निवडतात. ग्राहक मंच ग्राहकांचे हित व कर्तव्याची जाणिव करून देते. ग्राहक हिताला प्राधान्य देणारी ही संस्था असल्याचे संत यांनी सांगितले. गत वर्षभरात १३ विविध प्रकारांत मिळून ३ हजार ६३५ तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. पैकी ३ हजार ५५७ तक्रारींचे निराकरण करून ग्राहकांना न्याय देण्यात आला. गत दोन ते तीन वर्षांत आॅनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा वाढत आहे. याबरोबरच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढत असल्याबाबत संत म्हणाल्या, आॅनलाईन खरेदी केली तरी ग्राहकांना ग्राहकमंचात दाद मागता येते. न्यायही मिळू शकतो. मात्र ग्राहकांकडे वस्तू खरेदी केल्याची परिपूर्ण माहिती, पावत्या, संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच इतर पुरावा घेऊन ग्राहकमंचात तक्रार केल्यास न्याय मिळण्यास निश्चित मदत मिळू शकते. आॅनलाईन खरेदी केली आता तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न ग्राहकांना पडत असतो. मात्र आॅनलाईन तक्रारीही ग्राहकमंचा निकाली निघू शकतात. संत यांनी सांगितले की, शक्यतो कॅश आॅन डिलेव्हरीच करावी, आलेले पार्सल कुरिअरमन समक्षच फोडावे.
कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर तिची पक्की पावती ग्राहकांनी मागावी. तो त्यांचा हक्क आहे. मात्र कर जास्त लागतो म्हणून ग्राहक पक्की पावती मागण्याचे टाळतात.
४सोने असो अथवा एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पक्की पावती मागितल्यास त्याचा फायदा ग्राहकांनाच होत असल्याचे ग्राहक मंचच्या अध्यक्षा संत म्हणाल्या.
४त्याचबरोबर तुम्हाला लॉटरी लागली, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. तुमचा एटीएम क्रमांक द्या आदी अफावांवर ग्राहकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. त्या पूर्ण फसव्या असतात.