जायकवाडी पंपगृहाची आयुक्त करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:03 AM2017-08-18T01:03:32+5:302017-08-18T01:03:32+5:30

महावितरण कंपनी आणि महापालिका या दोन्ही संस्थांच्या टोलवाटोलवीत शहरातील नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे

 Judge of Jailwadi pamphment commissioner | जायकवाडी पंपगृहाची आयुक्त करणार पाहणी

जायकवाडी पंपगृहाची आयुक्त करणार पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महावितरण कंपनी आणि महापालिका या दोन्ही संस्थांच्या टोलवाटोलवीत शहरातील नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. जायकवाडी पंपगृहाच्या वीजपुरवठा यंत्रणेचा ‘फ्युज’ वारंवार का उडतो. याचे उत्तर शोधण्यासाठी आयुक्त डी. एम. मुगळीकर पंपगृह व वीजपुरवठा यंत्रणेची पाहणी करणार आहेत. आयुक्त मुगळीकर यांना गुरुवारी याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, जायकवाडी पंपगृहासाठी असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेण्यात येईल.
जायकवाडी येथून औरंगाबाद शहरासाठी पाणीपुरवठा करणाºया पंपगृहाच्या वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यास मनपा जबाबदार असून, याबाबत महावितरणच्या नावाने खापर फोडण्यात येत असल्याचा पलटवार महावितरणने केला. पालिकेने २०१३ मध्ये १५ लाख रुपयांतून वीजपुरवठ्याची यंत्रणाही अपडेट केली होती. असे असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते आहे.

Web Title:  Judge of Jailwadi pamphment commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.