रस्त्याच्या शोधात कारागृह

By Admin | Published: February 13, 2016 11:59 PM2016-02-13T23:59:42+5:302016-02-13T23:59:42+5:30

गंगाराम आढाव/ साबेर खान ल्ल जालना जालना जिल्हा कारागृह तयार झाल. मात्र वाहतुकीसाठी रस्ताच नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहच रस्त्याच्या शोधात असल्याचे चित्र आहे.

Junk in search of the road | रस्त्याच्या शोधात कारागृह

रस्त्याच्या शोधात कारागृह

googlenewsNext


गंगाराम आढाव/ साबेर खान ल्ल जालना
जालना जिल्हा कारागृह तयार झाल. मात्र वाहतुकीसाठी रस्ताच नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहच रस्त्याच्या शोधात असल्याचे चित्र आहे.
कारागृह प्रशासनाने रस्त्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू केला असला तरी रस्त्यासाठी अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावही तयार केला नाही. तसेच कारागृहाच्या अंतर्गत रस्त्यांसह संरक्षण विषयीच्या प्रश्न निर्माण झालेले आहे. कारागृहाचेही अनेक कामे अर्धवट आहेत. त्यामुळे कारागृह हे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.
शहरालगत असलेल्या इंदेवाडी शिवारात ७५ हेक्टर क्षेत्रात नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा कारागृहाचे काम अर्धवट असतानाच गत वर्षभरापूर्वी जिल्हा कारागृहाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र मागील वर्षभरापासून अद्यापपर्यंत अर्धवट राहिलेले कामे पूर्ण झालेली नाही.
मुख्य इमारतीच्या अतर्गंत रस्त्यांचे काम अर्धवट आहेत. तसेच कैद्यांसाठी दवाखान्याची व्यवस्था आहे. मात्र त्या ठिकाणी अद्याप डॉक्टर कर्मचारी वर्ग भरण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कैद्यांना जिल्हा रूग्णालयात उपचार करावा लागतात.
कारागृह परिसरात पथदिवे, सर्च लाईट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा नाहीत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या सर्व असुविधेच्या गर्तेत कारागृह इमारतीत आहे.
विशेष म्हणजे कारागृह इमारतीकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. पोलिस वसाहतीतून तेथील संरक्षण भिंत पाडून तात्पूरत्या स्वरूपाचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला. इंदेवाडीकडून सुमारे अर्धा किलो मीटर अंतरवर रस्ता जोडण्याचा पर्याय होता. मात्र या रस्त्यासाठी काही खाजगी लोकांची जमीन आड येत आहे. त्यामुळे तो प्रस्ताव रद्द करून कारागृहाच्या डाव्या बाजूने दगडवाडी, रेल्वे उड्डाण मार्गे रस्ता करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, रस्त्याबाबत अद्याप प्रस्तावाच आला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी स्पष्ट केले. रस्ता नसल्याने कर्मचाऱ्यांनाही कसरत करावी लागते. (समाप्त)

Web Title: Junk in search of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.