बस चालकास गजाने मारहाण

By Admin | Published: April 30, 2017 12:18 AM2017-04-30T00:18:11+5:302017-04-30T00:23:39+5:30

बदनापूर : एसटी बसला अडवून बस चालक, वाहकाला मारहाण करून तीन हजार आठशे रूपये बळजबरीने नेल्याप्रकरणी दहा आरोंपीविरूध्द बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Just beat the driver | बस चालकास गजाने मारहाण

बस चालकास गजाने मारहाण

googlenewsNext

बदनापूर : तालुक्यातील राजूर-औरंगाबाद मार्गावर एसटी बसला अडवून बस चालक, वाहकाला मारहाण करून तीन हजार आठशे रूपये बळजबरीने नेल्याप्रकरणी दहा आरोंपीविरूध्द बदनापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२९ एप्रिल रोजी औरंगाबादहून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एसटी (एमएच-२० बीएल २२८७) औरंगाबाद-राजूर ही बस राजूरकडे जात असताना एक प्रवासी टाकळी येथून या बसमधे बसला. हा प्रवासी दारात उभा असल्यामुळे चालकाने त्या प्रवाशाला बसमधे मागे बसण्यास सांगितले. त्यावरून त्याने चालकास शिवीगाळ केली. त्यानंतर तो प्रवासी तळेगाव येथे उतरला त्यानंतर बस राजूरला गेली व राजूरहून परत औरंगाबादकडे निघाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही बस सुंदरवाडी ता. बदनापूर येथे आली असता एक बैलगाडी ढकलून बस आडविण्याचा प्रयत्न झाला. चालकाने बसवर नियंत्रण मिळवून बस थांबविली. त्यानंतर चार ते पाच मोटारसायकलवर पाठलाग करीत आलेल्या दहा ते पंधरा इसम बसजवळ आले काहींनी बस चालकाला खाली उतरविले व बसमधील लोखंडी गजाने डोक्यात व हातावर मारहाण केली. चालकाच्या डोक्यास व हातास दुखापत झाली. वाहकालाही मारहाण करण्यात आली. बसवर दगडफेक केली त्यामधे बसच्या काही काचा फुटल्या तसेच वाहकाजवळील ३८२१ रूपये बळजबरीने हिसकावून घेतली सदर आशयाची फिर्याद बसचालक जीवनसिंग प्रेमसिंग मंडावत औरंगाबाद डेपो रा औरंगाबाद यांनी दिल्यावरून ज्ञानदेव साहेबराव खरात, अण्णा किसन दानवे, संतोष साहेबराव कान्हेरे, निवृत्ती साहेबराव कान्हेरे व इतर ६ ते ७ जणांविरूद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Just beat the driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.