बस दुकानात घुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:43 AM2018-05-28T00:43:59+5:302018-05-28T00:44:56+5:30

सिल्लोड शहरातील घटना : नालीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला

Just entered the shop | बस दुकानात घुसली

बस दुकानात घुसली

googlenewsNext

सिल्लोड : एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस चक्क दोन दुकानांत घुसली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
भगवान मंगथू चव्हाण (३५,रा.फदापूर तांडा, ता. सोयगाव, हल्ली मुक्काम मंगरुळ फाटा, सिल्लोड) असे या घटनेत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. औरंगाबादहून जळगावकडे जाणाऱ्या एसटीबस चालकाचा बस (क्र. एम.एच. १४ बी.टी.१८१2) वरील नियंत्रण सुटल्याने बस वळविताना ही बस सरळ मुख्य रस्त्यावरील समय वॉच सेंटर व राजस्थान मिठाई या दुकानात घुसली. यावेळी दुकानात बसलेल्या एका जणाच्या पायाला दुखापत झाली, तर बाजार करून गावाकडे निघालेला भगवान मंगथू चव्हाण हा गंभीर जखमी झाला. तसेच या अपघातात रस्त्यावर उभ्या एका स्कूटरला धडक लागल्याने त्या स्कूटर्सचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण बजरंग कुटुंबरे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.
नालीमुळे मोठी दुर्घटना टळली.
एसटी बसस्थानकाच्या गेटमधून बाहेर पडल्यावर जळगावकडे वळविताना बसचालक भागवत राठोड यांचे बस वरील नियंत्रण सुटले. एसटी बस जळगाव रस्त्याकडे न वळता ती चक्क सरळ रस्त्यालगतच्या दुकांनात घुसली सुदैवाने दुकानांच्या समोर मोठी नाली होती, त्या नालीमुळे एसटी बस नालीत अडकली व मोठा अनर्थ टळला. रविवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या संख्येत नागरिकांची या रस्त्यावर रेलचेल असते. मात्र, अपघातप्रसंगी या रस्त्यावर जास्त गर्दी नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.
पादचारी व रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नातून दुर्घटना.
अण्णाभाऊ साठे चौकात नेहमीच पादचारी व प्रवासी रिक्षा तसेच काळी पिवळी गाड्या उभ्या असतात. यातच रस्त्यालगत दुभाजकाच्या जवळ उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षाला वाचविताना एसटी बसचालकाला मोठे वळण घ्यावे लागले त्याचबरोबर रविवारचा आठवडी बाजार असल्याने पादचाºयांची संख्याही खूप जास्त असते. त्याचमुळे जीवितहानी टाळण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली.
- विजय बोरसे, आगारप्रमुख, सिल्लोड

Web Title: Just entered the shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.