फक्त एक पाऊल़़ वंचितांच्या आनंदासाठी
By Admin | Published: March 18, 2016 12:11 AM2016-03-18T00:11:29+5:302016-03-18T00:17:37+5:30
भारत दाढेल, नांदेड कळले तुझ्या डोळ्यात, मज दु:खाची आसवे, हसले खुदकुन चेहरे, अन ओझे झाले हलके़़़़
भारत दाढेल, नांदेड
कळले तुझ्या डोळ्यात, मज दु:खाची आसवे, हसले खुदकुन चेहरे, अन ओझे झाले हलके़़़़
या काव्यपंक्ती प्रमाणे वंचितांच्या चेहऱ्यावर क्षणभर हास्य फुलविण्यासाठी फेसबुकच्या जस्ट वन स्टेप या ग्रुपच्या तरूणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नांदेड शहरात मागील दोन महिन्यांपासून काम हाती घेतले आहे़
शहरात गोरगरीब, बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरात फिरणारे अपंग भिक्षुक, वेडसर व्यक्ती, फुटपाथवरील झोपणारे वृद्ध, अंध विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठी जस्ट वन स्टेपचे सदस्य रात्री, बेरात्री फिरून त्यांच्या गरजा भागविण्याचे काम करत आहेत़ यासाठी कोणते तरी निमित्त शोधून तो खर्च या कामासाठी वळविण्यात येत आहे़ ग्रुपमधील सदस्यांचे वाढदिवस असो की कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम असो़़़ हा सोहळा साजरा करण्यासाठी होणारा खर्च गोरगरीबांच्या मदतीसाठी केला जात आहे़ प्रत्येक सदस्य या कामासाठी आर्थिक मदत करतो़ त्यातुन जमा होणारी रक्कम ही सामाजिक कार्यासाठी खर्च केला जातो. मागील दोन महिन्यापासून हा उपक्रम नांदेड शहरात राबविण्यात येत आहे़
यासंदर्भात जस्ट वन स्टेप ग्रुपचे सदस्य मंत्रीनगर येथे राहणारे प्रशांत सावंत म्हणाले, वंचितांसाठी काही तरी करावे, यासाठी मागील तीन, चार महिन्यांपासून विचार करत होतो़ मग फेसबुकद्वारे ही संकल्पना मित्रांना सांगितली़ दहा मित्र तयार झाले़ त्यांनी मदतीचा हात पुढे केला़ आणि मग जस्ट वन स्टेप या नावाने ग्रुप तयार करून जानेवारीत कामाला सुरूवात केली़
थंडीचे दिवस असल्याने रेल्वेस्थानक, बसस्थानक, फुटपाथवर झोपणाऱ्या गोरगरिबांच्या अंगावर उबदार कपडे टाकण्याचा विचार आला़ आणि सर्व मित्रांनी ही योजना अंमलात आणली़ यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे फुललेले हास्य आमच्यासाठी उर्जास्त्रोत बनले़ आम्हाला आणखी बळ मिळाले़ त्यानंतर मित्राच्या वाढदिवसानिमित्त होणारा खर्च आम्ही याकामी खर्च करण्याचे ठरविले़ अन्न शिजवून ते पाकिटात भरले़ त्यानंतर पोटासाठी वणवण हिंडणारे भिक्षुक तसेच अपंग, वृद्धांना हे अन्न वाटप केले़ हे करताना आम्हालाही खुप समाधान वाटले़त्यानंतर आमच्या ग्रुपचे सदस्य संख्या हळूहळू वाढू लागली़
वसरणी येथील अंध विद्यालयातही असाच उपक्रम राबविण्यात आला़ त्याठिकाणी संगीत साहित्य नादुरूस्त होते़ आम्ही सर्वांनी यासाठी लागणार खर्च जमा करून तो या साहित्याची दुरूस्ती करण्यासाठी दिली़