जाती व्यवस्था मोडीत काढल्याशिवाय न्याय अशक्य
By Admin | Published: August 11, 2014 12:11 AM2014-08-11T00:11:28+5:302014-08-11T00:18:24+5:30
बीड : जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
बीड : जात व्यवस्था केव्हा अस्तित्वात आली हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र जाती-पातीच्या नावावर राजकीय पोळी पाजून घेत आहेत. देशातल्या अठरापगड जाती ओबीसीच्या नावाखाली जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळणे अशक्य आहे, असे मत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रविवारी ओबीसी जागृती मेळावा माजी केंद्रीय मंत्री खा. शरद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी अॅड. प्रताप बांगर हे होते तर माजी आ. पांडुरंग ढोले, व्ही. के. जैन, धोबी संघटनेचे बालाजी शिंदे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत, अॅड. महादेव आंधळे, अशोक माळी, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, विलास शिंदे, प्रकाश कानगावकर, प्रकाश राऊत, मंगल मोराळे, किशोर राऊत, बबन आंधळे, मोहन आघाव, प्रा. जगदीश जाधव, रफिक बागवान, गणेश जगताप, सुधीर जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रा. सुशिला मोराळे यांनी केले.
याप्रसंगी खा. शरद यादव म्हणाले की, समस्त ओबीसी समाजाला संपूर्ण अधिकार मिळालेले नाहीत. ओबीसीतील अठरापगड जातीला जाती-पातीत अडकवून ठेवले जात आहे. आमची श्रध्द अंधश्रध्देत बदलत चालली आहे. याचाच सत्ताधारी फायदा घेत आहेत. हा देश शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकऱ्यांमध्ये ओबीसींची मोठी संख्या आहे. जो पर्यंत जाती-पातीच्या श्रृंखला तोडून आपण एकत्र येत नाहीत. तो पर्यंत आपला विकास होणार नाही. असे मत खा. यादव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच प्रास्ताविकात प्रा. सुशिला मोराळे म्हणाल्या की, दुर्बल मानसिकतेतून ओबीसी समाज बाहेर यायला तयारच नाही. ओबीसी समाज हा देशाचा कणा आहे. या दृष्टीकोनातूनच जनता दलाने व्ही. पी. सिंगाच्या काळात मंडल आयोग लागू केला होता. मात्र या आयोगाची काँग्रेसच्या सरकारने पूर्णपणे अमलबजावणी न केल्याने ओबीसी ला न्याय मिळाला नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. प्रताप बांगर म्हणाले की, जो वर्ग बलवान आहे, तोच सत्तेची फळे चाकत आहेत. यामुळे ओबीसीला एकसंघ येऊन सक्षम बनावे लागेल असे त्यांनी सांगितले.
धोबी संघटनेचे बालाजी शिंदे यांनी म्हटले की, ज्यांनी सुरुवातीच्या काळात मंडल आयोग लागू करण्यासाठी विरोध केला तेच आता आरक्षणाची मागणी करीत आहेत. न्याय व हक्कासाठी ओबीसीने एक संघ चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अंधश्रद्धेमुळे ओबीसीची अधोगती होत आहे. याचा विचार आता सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम तीन तास चालला. मराठवाड्यातून मेळाव्याला ओबीसी बांधवांची उपस्थिती होती. यावेळी व्ही.के. जैन, अॅड. महादेव आंधळे, माजी आमदार पांडुरंग ढोले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)