ज्योती मुकाडे, विराज जाधव, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार यांची महाराष्ट्राच्या संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:51 AM2017-11-21T00:51:56+5:302017-11-21T00:53:15+5:30
सांगली येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ज्योती मुकाडे, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार आणि उस्मानाबादच्या विराज जाधव, जान्हवी पेठे, नम्रता गाडे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
औरंगाबाद : सांगली येथे २४ डिसेंबरपासून सुरू होणाºया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ज्योती मुकाडे, मयुरी पवार, आरती गंडे, अजय पवार आणि उस्मानाबादच्या विराज जाधव, जान्हवी पेठे, नम्रता गाडे यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंनी रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत विशेष ठसा उमटवला होता. औरंगाबादची आरती गंडे, उस्मानाबादची जान्हवी पेठे या मुलींच्या १४ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील, तर औरंगाबादचा अजय पवार व उस्मानाबादचा विराज जाधव हे १४ वर्षांखालील राज्य संघाचे प्रतिनिधित्व करतील. ज्योती मुकाडे आणि मयुरी पवार या औरंगाबादच्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
सांगली येथील राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारा महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील संघ (मुले) : पारस पाटील, मनीष पाटील (कोल्हापूर), साहील जाधव (मुंबई), भगवान वळवी (नाशिक), अजय पवार (औरंगाबाद), रमेश सहारे (नागपूर), अभय रत्नाकर (मुंबई), नागेश चोर्लेकर (सांगली), विराज जाधव (उस्मानाबाद), धीरज भावे (मुंबई), हर्ष माने (रत्नागिरी). राखीव : मनोज जाधव (उस्मानाबाद), पृथ्वीराज तांगडे (सोलापूर), दत्तात्रय पाटील (कोल्हापूर).
मुलींचा संघ : प्रीती डी., आरती एन., हर्षदा पाटील (कोल्हापूर), पुष्पा इंगवळे (सांगली), जान्हवी पेठे, नम्रता गाडे (उस्मानाबाद), नियती बंगाल, श्वेता वाघ, पूजा तवले, आरती गंडे, मीना कांबळे, काजल गायकवाड. राखीव खेळाडू : सानिका गुंजकर (कोल्हापूर), पायल गावडे (पुणे), सृष्टी कोणुरी (कोल्हापूर).
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मराठवाड्याच्या खेळाडूंना राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, सहसचिव गोविंद शर्मा, औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, डॉ. दीपक मसलेकर, युसूफ पठाण, रवींद्र दरंदले, गंगाधर मोदाळे, उदय पंड्या आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.