कबड्डी : निवड चाचणीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:23 AM2018-07-21T00:23:33+5:302018-07-21T00:24:08+5:30

औरंगाबाद जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे ४ व ५ आॅगस्ट रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे १९ वर्षांखालील कुमार, कुमारी गटाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खेळाडूंचा जन्म हा १६ सप्टेंबर १९९८ नंतरचा असावा. तसेच मुलांचे ७0 व मुलींच्या ६५ किलोपेक्षा कमी वजन असावे. या निवड चाचणीतून औरंगाबाद जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे.

Kabaddi: Organizing the Selection Test | कबड्डी : निवड चाचणीचे आयोजन

कबड्डी : निवड चाचणीचे आयोजन

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे ४ व ५ आॅगस्ट रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे १९ वर्षांखालील कुमार, कुमारी गटाची निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खेळाडूंचा जन्म हा १६ सप्टेंबर १९९८ नंतरचा असावा. तसेच मुलांचे ७0 व मुलींच्या ६५ किलोपेक्षा कमी वजन असावे. या निवड चाचणीतून औरंगाबाद जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी औरंगाबाद जिल्हा नोंदणी आॅनलाईन करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे वयासाठी मूळ आधार कार्ड, १0 वे बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जे संघ ४ आॅगस्ट रोजी सकाळी १0 वाजेपर्यंत नोंदणी करून उपस्थित राहतील अशा संघांनाच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ४ आॅगस्ट रोजी मुलींच्या गटातील, ५ रोजी ग्रामीण भागातील मुलांच्या गटातील आणि ६ आॅगस्ट रोजी औरंगाबाद शहरातील सर्व संघ व ग्रामीण भागातील अव्वल दोन संघ यांच्यात सामने रंगणार आहेत. या निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर, किशोर पाटील, विजय पाथ्रीकर, कार्याध्यक्ष बाबूराव अतकरे, एन.आर. घुले, मधू बक्षी आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. माणिक राठोड, मधुकर बोरसे, बळवंत मानकापे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Kabaddi: Organizing the Selection Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kabaddiकबड्डी