कचनेर यात्रोत्सवास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:04 AM2017-11-04T01:04:44+5:302017-11-04T01:05:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे शुक्रवारपासून त्रिदिवसीय वार्षिक यात्रा ...

Kachner festival started with Dharma Dhwajarohan | कचनेर यात्रोत्सवास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

कचनेर यात्रोत्सवास धर्मध्वजारोहणाने प्रारंभ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर येथे शुक्रवारपासून त्रिदिवसीय वार्षिक यात्रा महोत्सवाला उत्साहाने सुरुवात झाली. देशभरातून हजारो भाविक पहिल्याच दिवशी दाखल झाल्याने कचनेरनगरीला पंढरीचे स्वरुप आले आहे. मुख्य महामस्तकाभिषेक शनिवारी होणार आहे.
आज मुनीश्री प्रबलसागरजी महाराज, मुनीश्री विप्रणतसागरजी, आर्यिका गुरष्ठनंदनी माताजी, आर्यिका कुलभूषणमती माताजी आदी ससंघाच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहणाने सोहळा सुरु झाला. सर्वप्रथम महाप्रसाददाता प्रमोदकुमार कासलीवाल, सुनीलकुमार पाटणी, मनोजकुमार सावजी परिवाराच्या वतीने धर्मध्वजारोहण करण्यात आले.
सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रवीण लोहाडे यांनी केले तर बोलीया वाचन सुरेश कासलीवाल, डॉ. संतोष गंगवाल यांनी केले. बोलीयानंतर भगवंतांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. पायी यात्रेकरुंसाठी ठिकठिकाणी सामाजिक मंडळांकडून चहा व अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.
आडूळ येथील संतोष बबनलाल कासलीवाल व मुकेश कासलीवाल परिवाराच्या वतीने गेल्या ४० वर्षांपासून अल्पोहाराची, जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यात येत असते.
लोहाडे परिवार परसोडावाला, सावजी गु्रप, लासूर स्टेशन युवक मंडळ व अरिहंत गु्रप, पार्श्वनाथ गु्रप, रवी मसाले गु्रप आदींच्या वतीने अल्पोहाराची, गरम पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली आहे.
क्षेत्राच्या वतीने भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे. तीन दिवसीय चालणा-या वार्षिक यात्रा महोत्सवासाठी विश्वस्त मंडळ, कार्यकारिणी मंडळ, यात्रा समिती यांच्यासह शिक्षक, मंदिराचे कर्मचारी, पुजारी, सरपंच, गावकरी विशेष परिश्रम घेत असल्याची माहिती क्षेत्राचे महामंत्री भरत ठोळे यांनी दिली.

Web Title: Kachner festival started with Dharma Dhwajarohan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.