काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम शांततेत; पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:47 PM2018-08-01T12:47:16+5:302018-08-01T12:48:01+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव येथील आंदोलनात पाण्यात बुडून मृत झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम आज सकाळी शांततेत पार पडला.
औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव येथील आंदोलनात पाण्यात बुडून मृत झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा दहाव्याचा कार्यक्रम आज सकाळी शांततेत पार पडला. यावेळी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कायगाव टोका येथे झालेल्या आंदोलनात काकासाहेब शिंदे यांनी जीव दिला होता. आज त्यांच्या दहाव्याच्या कार्यक्रम कायगाव टोका येथे पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पुलावरील वाहतूक वळविण्यात आली होती. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात होते. कार्यक्रमानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पुलाचे केले नामकरण
काकासाहेब यांनी ज्या पुलावरून पाण्यात उडी घेऊन आपला जीव दिला त्या पुलाचे "हुतात्मा स्वर्गीय काकासाहेब शिंदे सेतु" असे नामकरण समर्थकांनी केले.