कलाग्राम ऋतुरंग महोत्सव २० पासून सुरू होणार
By Admin | Published: February 17, 2016 11:50 PM2016-02-17T23:50:28+5:302016-02-18T00:06:50+5:30
औरंगाबाद : रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद मेट्रो आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाग्राम ऋतुरंग महोत्सव यंदा २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान होत आहे.
औरंगाबाद : रोटरी क्लब आॅफ औरंगाबाद मेट्रो आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाग्राम ऋतुरंग महोत्सव यंदा २० ते २३ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक कार्य, उदयपूर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इनक्रेडिबल इंडिया, भारत सरकार आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गरवारे स्टेडियमशेजारील कलाग्राम येथे सायं. ६.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अनेक नामांकित कलावंत लोकसंगीत, लोकनृत्य, शास्त्रीय गायन, कव्वाली, वादन आणि नृत्य सादर करतील. देशभरातील विविध हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शनही येथे होणार आहे.
रोटरी क्लब आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संयुक्तपणे २३ रोजी विद्यापीठातील दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्र येथे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सौहार्दता परिषद आयोजित करण्यात आली आहे. यादिवशी सकाळी १० वा. या कार्यशाळेचे उद्घाटन होईल.