कळमनुरीतील दरोडा; अखेर दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:01 AM2017-08-05T00:01:57+5:302017-08-05T00:01:57+5:30
जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी या प्रकारचे गुन्हे घडले होते. सदर गंभीर गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान होते. यासाठी विशेष पथक स्थापन करून या घटनेतील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ४ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, जबरी चोरी या प्रकारचे गुन्हे घडले होते. सदर गंभीर गुन्हे उघडकीस येत नसल्याने पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान होते. यासाठी विशेष पथक स्थापन करून या घटनेतील दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी ४ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, स्थागुशाचे पोनि मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पथक स्थापन केले. पथकामध्ये पोउपनि व्ही.ए. लंबे, पोहेकॉ नानाराव पोले, हिदायत अली, विलास सोनवणे, संतोष वाठोरे, गणेश राठोड, फुलाजी सावळे, उंबरकर, शेख एजाज, पंचलिंगे आदींची नियुक्ती करून जिल्ह्यातील गंभीर गुन्हे उघडकीस आणणे याबाबत मार्गदर्शन केले.
त्यानुसार पोलीस स्टेशन कळमनुरी येथे घडलेल्या घरावरील दरोडा व सोनेचांदीच्या दुकानातील चोरीच्या गुन्ह्याची पद्धत व आरोपींचे घटनास्थळीच्या माहितीवरून अशा प्रकारच्या गुन्हा करणाºयांचे रेकॉर्ड पथकाने काढले. पोलिसांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन उमरी तालुका जि. नांदेड येथील प्रेमसिंग उर्फ पिल्लू धरमसिंग खिच्ची (२२), राजूसिंग मायासिंग बावरी (२७) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता वरील दोन्ही गुन्हे इतर साथीदारांसह केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी सोन्याचांदीचे दागिने अंदाजे किमत ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी सध्या कळमनुरी पोलीस ठाण्यात कोठडीत आहेत. तसेच १२ जुलै रोजी एकाच दिवशी हिंगोली शहर, औंढा नागनाथ, वसमत शहर या ठिकाणी दुचाकीवरून रस्त्यावरून जाणाºया इसम व महिलांचे पर्स, मोबाईल हिसकावून नेणाºया तिघांवर जबरीचोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादीकडून आरोपींची वेशभूषा व वर्णन घेतले व शोधमोहीम सुरू केली. नांदेड येथील अजय उर्फ गोप्या ढगे हा आपल्या वेगवेगळ्या साथीदारांसह अशा प्रकारचे गुन्हे करतो, अशी माहिती पोलिसांनी मिळाली.
या प्रकरणातील गुन्हेगारांची अधिक चौकशी केली जात असून त्यांच्याविरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी सांगितले.