कलासागरला मिळाली राष्ट्रीय ओळख, संस्थेच्या आवरणासह संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या योगदानावर टपाल तिकीट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 05:51 AM2018-08-12T05:51:27+5:302018-08-12T05:51:56+5:30
औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना ...
औरंगाबाद -सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था क लासागरला टपाल खात्याकडून राष्टÑीय ओळख मिळाली आहे. टपाल खात्याने संस्थेचे आवरण जारी करताना संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले आहे. गुरुवारी एका शानदार कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले.
कलेची उपासना क रणाऱ्या कलाकारांना मागील २७ वर्षांपासून एक भव्य व्यासपीठ देण्याचे श्रेय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांना जाते व त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त या विशेष आवरणाची संकल्पना कलासागरच्या २०१८ च्या कार्यकारिणीने मांडली व भारतीय टपाल खात्याने ती उचलून धरली. त्याचबरोबर टपाल खात्याद्वारे माय स्टॅम्पनामक जारी करण्यात येत असलेल्या टपाल तिकिटांच्या
शृंखलेत आशू दर्डा यांच्या चित्राचे माय स्टॅम्पही प्रकाशित करण्यात आले. या सर्वांचे फिलाटेलिक क्षेत्रात मोठेमहत्त्व आहे.
गुरुवारी येथे कलासागरच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यक्रमात तिकिटाचे प्रकाशन क रण्यात आले. यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, कलासागरचे अध्यक्ष राजेश भारुका, सचिव विशाल लदनिया, कोषाध्यक्ष गुरप्रीत सिंह बग्गा, प्रोजेक्ट चेअरमन मनीष पारेख व उद्योगपती सीताराम अग्रवाल उपस्थित होते. लोकमत समूहाचे संस्थापक संपादक , ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्यावरील टपाल तिकि टानंतर सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी
लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आशू दर्डा यांच्यावर टपाल तिकीट जारी होत आहे, हे येथेविशेष उल्लेखनीय.
कलासागरवर मी जेवढे प्रेम केले, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम आपण मला दिले. आज या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाच्या माध्यमातून
कलासागरचेनाव संपूर्ण देशात अमर झालेआहे. −आशू दर्डा, संस्थापक अध्यक्ष, कलासागर
२७ वर्षांचेयोगदान : औरंगाबादमध्ये कलासागरची स्थापना २७ वर्षांपूर्वी झाली. मराठवाड्यातील एका उदयोन्मुख शहराला देशाच्या सांस्कृतिक घडामोडींशी जोडण्याचा संस्थेचा उद्देश होता. छोट्या शहरातील मोठ्या सुरुवातीनंतर प्रारंभिक संघर्षानंतर संस्थेनेअनेक शिखरे गाठली. देशातील ज्येष्ठ कलाकार आशा भोसलेयांच्यापासून श्रेया घोषाल, जगजित सिंह यांच्यापासून सोनू निगम,
हेमा मालिनीपासून मल्लिका साराभाई, शबाना आजमीपासून अनुपम खेरपर्यंत अनेक कलाकारांनी क लासागरच्या व्यासपीठावर क ला सादर केलेली आहे.
टपाल खात्याचेम्हणणे आहेकी, हे विशेष आवरण जगभरातील टपाल तिकाट संग्राहकांच्या संग्रहात विशेष स्थान प्राप्त करील व
देश−विदेशातील वेगवेगळ्या टपाल तिकिटांच्या फि लाटेलिक प्रदर्शनांतही पाहण्यास मिळेल. टपाल खात्याने कलासागरची निवड एकूण १२ विविध अर्जांमधून केली असून, औरंगाबाद शहरासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.