कंधार, उमरी तालुक्याने पावसाची निम्मी सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:25 AM2017-08-27T00:25:44+5:302017-08-27T00:25:44+5:30
तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मिमी आहे, परंतु २४ व २५ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने ४५१.६६ मिमीची नोंद झाल्याने निम्मी सरासरी ओलांडली. मात्र जलसाठे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८३३ मिमी आहे, परंतु २४ व २५ आॅगस्ट रोजी झालेल्या पावसाने ४५१.६६ मिमीची नोंद झाल्याने निम्मी सरासरी ओलांडली. मात्र जलसाठे अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात १९ आॅगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले. दोन मंडळ वगळता चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. तालुक्यात सरासरी ८४.८५ मिमी पावसाची नोंद झाली. २० आॅगस्ट रोजी सरासरी २०.६६ मिमी पावसाची नोंद होऊनही निम्मी सरासरी ओलांडली नाही. २४ आॅगस्ट रोजी १३ मिमी पाऊस झाला. त्यात निम्मी सरासरी ओलांडली. २५ आॅगस्ट रोजी गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाचे सर्वदूर आगमन झाले. तालुक्यातील जलसाठ्यांमध्येही वाढ झाली.