कन्नड-सोयगावच्या सत्ताधारी सेना आमदाराचे रस्ते कामासाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:20 AM2018-02-08T00:20:38+5:302018-02-08T00:20:44+5:30
कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आ.हर्षवर्धन जाधव यांना सत्तेत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात बुधवारी लाक्षणिक उपोषण करावे लागले. दोन वर्षांपासून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा निघत नाहीत. स्थानिक पातळीवर अधीक्षक अभियंता खोटी आश्वासन पत्रे देऊन दिशाभूल करीत आहेत. १२ रस्त्यांच्या कामांना केव्हा मुहूर्त लागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करून आ.जाधव हे मतदारसंघातील शेकडो नागरिकांसह बांधकाम भवन, स्नेहनगर येथे उपोषणाला बसले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आ.हर्षवर्धन जाधव यांना सत्तेत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात बुधवारी लाक्षणिक उपोषण करावे लागले. दोन वर्षांपासून मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या निविदा निघत नाहीत. स्थानिक पातळीवर अधीक्षक अभियंता खोटी आश्वासन पत्रे देऊन दिशाभूल करीत आहेत. १२ रस्त्यांच्या कामांना केव्हा मुहूर्त लागणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करून आ.जाधव हे मतदारसंघातील शेकडो नागरिकांसह बांधकाम भवन, स्नेहनगर येथे उपोषणाला बसले होते.
बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्य अभियंता एम. एम. सुरकुटवार यांच्यामार्फ त अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी आ.जाधव यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी कार्यकारी अभियंता भगत, मुख्य अभियंत्यांचे पीए रेणुकादास कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
आ.जाधव यांनी याच १२ कामांच्या मागणीसाठी मध्यंतरी बांधकाममंत्री पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर आ.जाधव यांनी पाटील यांच्यावर ५ कोटींत भाजप प्रवेशाची आॅफर दिल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या घटनेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी लोटला; परंतु जाधव यांच्या मतदारसंघातील कामांना सुरुवात होत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले. त्या आरोपामुळेच माझी कामे थांबविण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. कंत्राटदार संघटनेने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता.
सासरे सत्तेत तरीही उपोषण
आ. जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे सत्तेतील महत्त्वाचे नेते आहेत. तरीही तुमच्या मतदारसंघात कामे होत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर ते म्हणाले, सासºयांचे नाव घेऊ नका. त्यांनी धोंडे जेवणासाठी बोलावले तर जाईल. माझे नेते शिवसेना पक्षप्रमुखच आहेत.
अधीक्षक अभियंता बोगस
अधीक्षक अभियंता चव्हाण ही व्यक्ती बोगस आहे. त्यांची येथून बदली झाली पाहिजे. जिल्ह्यातील खड्डे भरण्याचे काम निकृ ष्ट झाल्याचा आरोप आ. जाधव यांनी केला. मध्यंतरी चव्हाण यांच्या कामांचा भंडाफोड केल्यामुळेच त्यांचा माझ्यावर राग असल्याचे त्यांनी नमूद केले. तर कंत्राटदार संघटनेने चव्हाण हे ‘प्रो’भाजप या धोरणानुसार विभागातील कामांबाबत निर्णय घेत असल्याचा आरोप केला.