कन्नड सुपरकिंग संघ चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:22 AM2017-12-14T01:22:40+5:302017-12-14T01:23:32+5:30

एमजीएमच्या क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर आज झालेल्या अंतिम सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर १६ धावांनी विजय मिळवताना एमजीएम टष्ट्वेंटी-२० करंडक जिंकला.

Kannad Superking Team Champion | कन्नड सुपरकिंग संघ चॅम्पियन

कन्नड सुपरकिंग संघ चॅम्पियन

googlenewsNext
ठळक मुद्देएमजीएम टष्ट्वेंटी-२० करंडक : अलॉफ्ट लायमर संघावर मात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू फलंदाज : उदय पांडे गोलंदाज : संदीप सहानी मालिकावीर : सय्यद जावेद

औरंगाबाद : एमजीएमच्या क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर आज झालेल्या अंतिम सामन्यात कन्नड सुपरकिंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर १६ धावांनी विजय मिळवताना एमजीएम टष्ट्वेंटी-२० करंडक जिंकला. मनीष राव सामनावीर ठरला.
कन्नड सुपरकिंग संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५६ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून मनीष राव याने २८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ४२ तर शुभम हरकळ याने ३८ चेंडूंत ३५ धावा केल्या. ओंकार गुरवने २४ व विनायक भोयर याने १८ धावांचे योगदान दिले. अलॉफ्ट लायमर संघाकडून आशिष देशमुखने ३३ धावांत ३ गडी बाद केले. मोहंमद इम्रान व सुशील अरक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अलॉफ्ट लायमर संघ २० षटकांत ९ बाद १४० या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून रामण्णा नंदागिरीने २२, मोहमद इम्रान व मोहमद आमेर यांनी प्रत्येकी २० तर सय्यद जावेदने २३ धावा केल्या. कन्नड सुपर किंगकडून विनायक भोयरने २५ धावांत ३ व विद्याधर कामतने ३२ धावांत २ बळी घेतले. मनीष राव व प्रथमेश डाके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर उपजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. गिरीश गाडेकर, रणजित कक्कड व प्राचार्या रेखा शेळके यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश वंजारे यांनी केले, तर आभार मनीष पोलकम यांनी मानले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर शेवाळे, मनीष पोलकम, संग्राम देशमुख, शरद पवार, नीलेश हारदे, रहीम खान, सदाशिव झवेरी, अब्दुल शेख, लमण सूर्यवंशी, सय्यद निजाम, जॉय थॉमस आदींनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Kannad Superking Team Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.