कन्नड तालुक्यात गुरुवारी २५ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:05 AM2021-03-13T04:05:27+5:302021-03-13T04:05:27+5:30
कन्नड : कोरोनाने गुरुवारी कन्न्ड तालुका हादरून टाकला आहे. तब्बल २५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील प्रशासन पुन्हा ...
कन्नड : कोरोनाने गुरुवारी कन्न्ड तालुका हादरून टाकला आहे. तब्बल २५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे. यात शहरातील १२, तर ग्रामीण भागात १३ जणांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रतिबंधक उपाय सुचविण्यात येत आहेत. मात्र, त्यांचे पालन होताना दिसत नाही. विवाह समारंभ, राजकीय कार्यक्रम, उद्घाटने, दुकानांमधील गर्दी, सामाजिक अंतराचा फज्जा आणि विशेष म्हणजे विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या या बाबीचे निरीक्षण केले तर कोरोनाबद्दलचे गांभीर्य कुणालाही नाही असेच दिसते.
सध्या तालुक्यात ८८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यापैकी ग्रामीण रुग्णालयाच्या उपचार केंद्रात ३५, शिवाजी कॉलेज ३२, इतर खासगी दवाखान्यात १२ व जिल्हा सामान्य रुग्णालयात नऊजण उपचार घेत आहेत.
गुरुवारी निघालेले रुग्ण
ग्रामीण भागात मुंडवाडी, नागद, सीतानाईक तांडा, वासडी, सिरजगाव, कारखाना, घाटशेंद्रा, शेलगाव व जातेगाव येथे प्रत्येकी एक, तर पिशाेर येथे चारजणांचे व कन्नड शहरात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.