कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तूर वळणावर बस रस्त्याखाली उतरली, २० प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:08 PM2024-03-11T18:08:47+5:302024-03-11T18:36:49+5:30
कन्नड- चाळीसगाव घाट संपताच शेवटच्या वळणार चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले
- प्रवीण जंजाळ
कन्नड: मध्यप्रदेश परिवहन विभागाची एक बस सेंधवाकडे जात असताना आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तुरी फाट्याजवळ वळण घेत असताना रस्त्याखाली उतरली. यात कसलीही जीवितहानी झाली नसून बसमधील २० प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, मध्यप्रदेश परिवहन विभागाची एक बस आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून सेंधवा येथे निघाली होती. सकाळी अकरा वाजता कन्नड- चाळीसगाव औट्रम घाटातील दस्तुरी फाट्याजवळ वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली उतरली. यात बसमधील २० प्रवासी जखमी झाले. यावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते.
कन्नड - चाळीसगाव औट्रम घाटात मध्यप्रदेश परिवहनची बस वळणावर रस्त्याखाली उतरली, २० प्रवासी जखमी #chhatrapatisambhajinagar#Accidentpic.twitter.com/qPO57TvrW3
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) March 11, 2024
दरम्यान, जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यातील दोन प्रवाश्यांची तब्येत गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. मंदार करबळेकर यांनी दिली आहे. राजंणगाव प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अर्पिता पाटील , सहाय्यक अधिकारी कैलास राठोड, आरोग्य सेवक नितीन तिरमली, अश्विनी बनसोडे आणि संभाजी यांनी जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत केली. तसेच माहिती मिळताच चाळीसगाव वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोहचून मदत कार्य केले.