कर दे धमाल! छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगणार १७ डिसेंबरला महामॅरेथॉनचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:52 PM2023-12-02T12:52:06+5:302023-12-02T12:55:26+5:30
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके.
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या या महामॅरेथॉनमध्ये अख्ख्या कुटुंबांसोबत धावण्याचा ‘गोल्डन चान्स’ मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत धावण्याचा आपला आनंद द्विगुणीत करण्याची आणि एका महोत्सवाचे साक्षीदार ठरण्याची संधी यानिमित्ताने लोकमत समूहाने आपल्यासाठी निर्माण केली आहे. त्यामुळे सहभागी धावपटूंसाठी पुन्हा एकदा ‘कर दे धमाल’ करता येणार आहे.
समाजात एकोपा वाढविणारी निरोगी आरोग्याचा संदेश देणारी आणि आपसातील नाते आणखी वृद्धिंगत करणारी ही महामॅरेथॉन आता मराठवाड्याच्या नागरिकांसाठी जिव्हाळा निर्माण करणारी मॅरेथॉन झाली आहे.
असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन ॲण्ड डिस्टन्स रेसतर्फे (एम्स) पात्रता दर्जा प्राप्त असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही महत्त्व प्राप्त झालेल्या या महामॅरेथॉनची प्रत्येक जणच प्रतीक्षा करीत असतो. निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचा श्रीगणेशा करण्यासाठीदेखील ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरणारी आहे. याचे कारण म्हणजे या महामॅरेथॉनमध्ये ज्यांना धावण्याची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी ३ व ५ कि. मी. हे अंतर असणार आहे. तसेच १२ पेक्षा जास्त व धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ५ कि.मी. अंतराच्या फन रनचा यात समावेश आहे.
१६ वर्षांपेक्षा जास्त असणारे १० कि.मी. पॉवर रनमध्ये सहभागी होऊ शकतात, तर नियिमत सराव असणारे प्रोफेशनल धावपटूंसाठी २१ कि.मी. अंतर असणार आहे. त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनचा लोकप्रियतेचा आलेख नेहमीच उंचावत राहिला आहे. धावू न शकणारेदेखील विविध पद्धतीने महामॅरेथॉनमध्ये आपले योगदान देऊ शकतात. विभागीय क्रीडा संकुलावर दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
यंदा सातवे पर्व
यंदा महामॅरेथॉनचे हे सातवे पर्व आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे गत वर्षीप्रमाणे यंदाही सहा ठिकाणी लोकमत महामॅरेथॉनमध्ये धावण्याची संधी धावपटूंना मिळत आहे. यंदा लोकमत महामॅरेथॉनचा श्रीगणेशा ३ डिसेंबर रोजी महा मुंबई मॅरेथॉनने होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दि. १७ डिसेंबर, नाशिक येथे दि. ७ जानेवारी, कोल्हापूरला दि. २८ जानेवारी, नागपूरला दि. ४ फेब्रुवारी आणि पुणे येथे दि. १८ फेब्रुवारी रोजी महामॅरेथॉन रंगणार आहे.
१२ लाखांपर्यंत पारितोषिके
मॅरेथॉनमध्ये २१ आणि १० कि.मी.मध्ये सहभागी झाल्यानंतर १२ लाखांपर्यंत असणार पारितोषिके. तसेच ३ आणि ५ कि.मी.मधील स्पर्धकांना मिळणार मेडल आणि प्रमाणपत्रे. यंदा होणारी महामॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी. अंतरात होणार आहे.
अत्युच्च दर्जाची महामॅरेथॉन
दि. १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनसाठी धावपटू, नागरिक वर्षभरापासून शहरातील विविध मैदानांवर कसून सराव करीत आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारे टोकियो, लंडन, न्यूयॉर्क मॅरेथॉनला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेेली ही अत्युच्च दर्जाची लोकमत समूहाची महामॅरेथॉन असल्याची प्रतिक्रिया सहभागी धावपटूंत नेहमीच असते.
ऑनलाइन नोंदणीसाठी :
http://tiny.cc/LokmatAurangabad या लिंकवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना वैयक्तिक आणि ग्रुप रजिस्ट्रेशनही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२३९३१८७३, ८०५५५६२१२१, ७३८७३३३८७८, ८९९९६११९५४ या क्रमांकावर संपर्क साधा.