तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा कराटे शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:05 AM2021-07-02T04:05:47+5:302021-07-02T04:05:47+5:30

औरंगाबाद : आपल्या १८ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ४१ वर्षांचा विवाहित कराटे शिक्षक तिच्यासोबत राहत असल्याने ...

A karate teacher living in a live-in with a young woman has been arrested by the police | तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा कराटे शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहणारा कराटे शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

googlenewsNext

औरंगाबाद : आपल्या १८ वर्षांच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून ४१ वर्षांचा विवाहित कराटे शिक्षक तिच्यासोबत राहत असल्याने संतापलेल्या तिच्या आईवडिलांनी त्याच्या घरी जाऊन गोंधळ करायला सुरुवात केली. ही बाब कळताच पुंडलिकनगर पोलिसांनी या कराटे शिक्षकाला ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. ही घटना गुरुवारी रात्री भारतनगर येथे घडली.

गारखेडा परिसरातील भारतनगर येथील कराटे शिक्षक असलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीचे आधीच दोन लग्न झाले. पहिलीला सोडल्यावर दुसरीसोबत तो राहत असताना काही दिवसांपासून अठरा वर्षांच्या तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहात आहे. आपल्या मुलीला कराटे शिकविण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी जवळीक वाढवून तिला घरात ठेवल्याची माहिती मिळताच तिच्या आईबाबांनी गुरुवारी रात्री सरळ त्याचे घर गाठले. त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली तरुणी आईबाबांसोबत जाण्यास तयार नव्हती. यावेळी त्यांनी आरडाओरड करून गोंधळ सुरू केला. ही बाब कळताच पुंडलिकनगरचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, हवालदार डोईफोडे आणि कर्मचारी तेथे पोहोचले. यानंतर पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यात नेले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सर्वांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. यावेळी पोलिसांनी तिचे समुपदेशन करताना तिला सांगितले की, तो तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे. त्याची पहिली आणि दुसरी बायकोपण दोन मुलांसह सोडून गेली आणि आता ही तिसरी करतो आहे. तेव्हा तुला तो कसा वागवेल याचा विचार कर. मात्र, ती कुणाचेही ऐकत नव्हती.

Web Title: A karate teacher living in a live-in with a young woman has been arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.