नवरात्रोत्सवासाठी सजतोय कर्णपुरा यात्रा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 01:06 AM2017-09-20T01:06:47+5:302017-09-20T01:06:47+5:30
दि. २१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी कर्णपुरा येथील यात्रेचीही जय्यत तयारी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कर्णपुरा येथील कर्णी देवी अवघ्या शहराचेच श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवादरम्यान केवळ शहरातूनच नव्हे तर मराठवाड्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. कर्णपुरा येथे भरणारी यात्रा दरवर्षी आबालवृद्धांसाठी मोठे आकर्षण ठरते. दि. २१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी कर्णपुरा येथील यात्रेचीही जय्यत तयारी सुरू आहे. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे तीन वाजता धार्मिक विधीला सुरुवात होणार असून, सहा वाजता आरती होऊन महोत्सवास सुरुवात होईल.
यात्रेत विविध खेळ आणि स्टॉल लावण्यासाठी परराज्यातूनही अनेक व्यापारी, कारागीर दरवर्षी येतात. उत्सव जवळ आल्यामुळे आपापले खेळ लावण्यासाठी व्यापाºयांची जणू लगीनघाईच सुरू असल्याचे उत्साहवर्धक दृश्य मंगळवारी दुपारी कर्णपुºयात दिसून आले. आपल्या खेळाची किंवा दुकानाची जुळवाजुळव करताना मागील चार- पाच दिवसांपासून नियमितपणे बरसणाºया वरुणराजाचा सामनाही या व्यापाºयांना करावा लागत आहे.
यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या कमानीतून आत प्रवेश केल्यावर विविध प्रकारचे खेळ यात्रेक रूंचे लक्ष वेधून घेणार आहेत. पाच उंचच उंच आकाशपाळणे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरतील. याशिवाय दरवर्षीप्रमाणे या वर्षीही २ प्रकाराचे टोरा- टोरा गेम, बे्रकडान्स, आरसा हाऊस, पन्नालाल गधा, लहानमुलांसाठी कमी उंचीचे रहाटपाळणे, मिनीट्रेन अशा विविध प्रकारच्या खेळांनी कर्णपुरा यात्रा सजणार आहे. यानंतर दुसºया टप्प्यात चपला, ज्वेलरी, क्रॉकरी, शोभेच्या व कलाकु सरीच्या वस्तू, हातमागाच्या वस्तूंचे विविध स्टॉल असतील. तिसरा टप्पा खास खवय्यांसाठी सजणार असून, यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जाणार आहेत. कर्णपुºयाच्या समोरच्या पंचवटी चौकात उड्डाणपुलाखालील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना गाडी चालविणे मोठे जिकीरीचे ठरते आहे. यात्राकाळात हजारोंच्या संख्येने भाविक या परिसरात येतात, ही गोष्ट लक्षात घेऊन यात्रेपूर्वीच रस्त्याचे काम करायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.