कार्तिक आर्यन बनणार पत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:06 AM2020-12-22T04:06:06+5:302020-12-22T04:06:06+5:30

कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये त्याने पत्रकाराची भूमिका केली आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर ...

Karthik Aryan to become a journalist | कार्तिक आर्यन बनणार पत्रकार

कार्तिक आर्यन बनणार पत्रकार

googlenewsNext

कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये त्याने पत्रकाराची भूमिका केली आहे. कार्तिकने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये ‘मिलीए अर्जुन पाठक से’. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. रॉनी स्क्रूवाला निर्मित आणि राम माधवानी दिग्दर्शित या चित्रपटाची कहानी मुंबईतील आहे. कार्तिकने साकारलेल्या रिपोर्टरला एक अज्ञात फोनवर बांद्रा-वरळी सी लिंक उडवून देण्याची धमकी देतो. या चित्रपटाचे शुटींग केवळ २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी एक पूर्ण हॉटेल २० दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या काळात कोणीही बाहेर जाऊ शकणार नाही किंवा आतमध्ये येणार नाही.

नव्या पोस्टरमुळे केजीएफ २ ची उत्सुकता वाढली

प्रचंड उत्सुकता असलेल्या केजीएफ या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग केजीएफ २ चे नवीन पोस्टर निर्मात्यांनी शेअर केले आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी पोस्टर शेअर करताना लिहिले होते की, ८ जानेवारीला सकाळी १०.१८ वाजता साम्राज्याची झलक पहा. यासाठी कदाचित वेळ लागला असेल, परंतु आम्ही आणखी स्ट्रॉँग होऊन आलो आहोत. केजीएफ २ मध्ये यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडनदेखील चित्रपटात दिसणार आहेत. संजय खलनायक अधीरा आणि रवीना रामिका सेनच्या भूमिकेत दिसणार आहे. केजीएफ या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनामुळे चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होईल.

सुहानाने विचारले, एकही भारतीय डिस्ने राजकुमारी का नाही?

मुलांच्या भावविश्वात डिस्नेच्या पात्रांची वेगळे महत्व असते. अनेक राजकन्यांच्या गोष्टी आपण ऐकतो. दरवर्षी डिस्नेकडून डिस्ने प्रिन्सेस म्हणून यादीही प्रसिध्द केली जाते. शाहरुख खानची मुलगी सुहानाने डिस्ने कंपनीला विचारले आहे की आत्तापर्यंत एकही भारतीय मुलगी डिस्ने राजकुमारी का नाही? सुहानाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका राजकुमारी फोटो शेअर केला असून ‘डिस्ने इंडीयन प्रिन्सेस बनाओ’ असे म्हटले आहे.

Web Title: Karthik Aryan to become a journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.