भाविकांच्या भक्तीरसात रंगला कार्तिकी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:07 PM2018-11-19T17:07:49+5:302018-11-19T17:07:56+5:30
वाळूज महानगर : वारकरी व भाविकांच्या भक्तीरसात छोट्या पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सोमवारी कार्तिकी सोहळा चांगलाच रंगला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच येथील श्रीविठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
वाळूज महानगर : वारकरी व भाविकांच्या भक्तीरसात छोट्या पंढरपूरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सोमवारी कार्तिकी सोहळा चांगलाच रंगला होता. कार्तिकी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांनी सकाळपासूनच येथील श्रीविठ्ठल-रुख्मिणी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सोमवारी कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे ५ वाजता श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात राजेंद्र पवार व छाया पवार या दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक, आरती व महापुजा करण्यात आली.
या प्रसंगी श्री विठ्ठल-रुख्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे, ह.भ.प.भिकाजी महाराज खोतकर, राजेंद्र पवार, विठ्ठल वाकळे आदींची उपस्थिती होती. महाअभिषेक व आरती झाल्यानंतर मंदिराचे द्वार भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या.
भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे, यासाठी विश्वस्त मंडळाच्यावतीने विशेष उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल व विठु नामाचा जयघोष करीत दिंड्या,भाविक व वारकऱ्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती.
या सप्ताहात दररोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत कथा वाचन, हरिपाठ, हरिकिर्तन, हरिजागर या धार्मिक संपन्न झाले. या प्रसंगी ह.भ.प.अंबादास महाराज यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करुन भाविकात जनजागृती केली. यावेळी ह.भ.प.बालगिरी महाराज, ह.भ.प.श्रीकृष्ण महाराज शिंदे, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दिघे,ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे, ह.भ.प.माधव महाराज नरवडे, स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांनी किर्तनातून भाविकात समाज प्रबोधन केले. मंदिरात दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी संस्थान व प्रकाश (मामा) झळके, काशीनाथ झळके, लक्ष्मण झळके आदींच्यावतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्तिकी एकादशीनिमित्त सकाळपासूनच वळदगाव, पंढरपूर, बजाजनगर, सिडको वाळूजमहानगर, साऊथसिटी, रांजणगाव, घाणेगाव, पाटोदा, वाळूज, गंगापूर नेहरी, शिवराई तसेच शहरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळपासून भाविकांची गर्दी
मंदिर परिसरात समता ब्लड बँक व आदर्श ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच भाविकांत रक्तदानाविषयी जनजागृती करण्यात आली. कार्तिकी यात्रेनिमित्त विविध व्यवसायिकांनी संसारोपयोगी साहित्याची दुकान थाटली होती.
आज काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात सुरु असल्याचे अखंड हरिनाम सप्ताहाची मंगळवारी सांगता केली जाणार आहे. सकाळी ह.भ.प.कैलास गिरी महाराज यांचे ९ ते ११ या वेळेत काल्याचे किर्तन होणार असून यानंतर संस्थानच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याचे संस्थानचे अध्यक्ष रत्नाकर पा.शिंदे यांनी सांगितले.